Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. रामदास आठवले म्हणाले “हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही. त्रिभाषा सूत्रामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी यांचा समावेश असणे गरजेचे आहे. मराठी ही आमची मातृभाषा आहेच आणि तिचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, इंग्रजी व हिंदी भाषाचं  ज्ञानही आजच्या काळात अत्यावश्यक आहे.


महाराष्ट्रातील शाळांमध्ये सर्व विषय मराठीतच शिकवण्याचा काही आदेश सरकारने दिलेला नाही,” अशी त्यांनी भूमिका स्पष्ट केली.   तसेच राज ठाकरे यांच्याबद्दल रामदास आठवले यांनी आपलं मत मांडलं ते पुढे म्हणाले.“राज आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदीविरोधी भूमिका घेणं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांशी विसंगत आहे. राज्य सरकारने अशा दबावात न येता योग्य निर्णय घ्यावा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून योग्य भूमिका अपेक्षित असून, आमचा पाठिंबा त्यांना आहे.” असे देखील आठवले म्हणाले.


मराठी हा आमचा अभिमानाचा विषय


मराठी भाषे बद्दल बोलताना रामदास आठवले म्हणाले, “मराठी हा आमचा अभिमानाचा विषय आहेच, पण महाराष्ट्राबाहेर हिंदी ही संवादाची गरज असते. मुंबईसारख्या बहुभाषिक शहरातही अनेकजण मराठीत बोलताना दिसतात, ही अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, हिंदीचा अवमान होणे योग्य नाही. इंग्रजीचं महत्त्वही नाकारता येत नाही. आपण मराठी माणसं असलो तरी राष्ट्रभाषेचा सन्मान राखणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे.” मराठी भाषा बद्दल आठवले यांनी भूमिका स्पष्ट केली.








Comments
Add Comment

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मेट्रो २ ‘ब’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम

मुंबई : मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याच्या संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे

बुरख्याच्या परवानगीसाठी आंदोलन

मुंबई  : गोरेगावमधील विवेक एज्युकेशन सोसायटीच्या विवेक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयाने कपड्यांबाबत आचारसंहिता