Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ होऊ शकते . गावातील काही टीकांवर बोलताना लोणीकरांची जीभ घसरली. तुमच्या बापाला पेरणीची पैसे मोदींनीच दिले आहेत. अशी भाषा लोणीकरांनी वापरली आहे.“तुमच्या आई, बहीण आणि बायकोला देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हीच देतो. तुमच्या अंगावरचे कपडे आणि बुटं देखील आम्हीच दिलेले आहेत” अशी भाषा लोणीकरांनी वापरली होती.


लोणीकरांच्या विधानावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, फडणवीस म्हणाले “बबनराव लोणीकरांच विधान पूर्णपणे चुकीच आहे. काही लोकांना उद्देशून जरी त्यांनी असं विधान केलं असेल तरी असं विधान करण्याचा कोणालाही अधिकार नाही. देशाचे पंतप्रधान म्हणतात मी प्रधानसेवक आहे. आम्ही सर्व जनतेचे सेवेक आहोत, आम्हाला मालक बनता येणार नाही. बबनराव लोणीकरांच वक्तव्य चुकीच आहे, तशी त्यांना समज देण्यात येईल” असे मुख्यमंत्री म्हणाले.


राज्यात गेला काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्तीवरुन राजकारण सुरु आहे.  हिंदी भाषा सक्तीवरुन देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले.  “माझ उद्धवजींना एवढच सांगणं आहे की, मराठी भाषेत टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत, त्या अलंकारांचा उपयोग केला, तर चांगलं होईल. राज्यात हिंदी सक्ती नाही, मराठी सक्ती आहे. हिंदी ऑप्शनल आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


ये पब्लिक हैं, सब जानती हैं”  देवेंद्र फडणवीसांचा विश्वास 


यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती राहुल गांधी यांनी वारंवार आरोप केले होते, त्यासंदर्भात मुंबई हायकोर्टाने काल भूमिका स्पष्ट केली. पत्रकारांच्या प्रश्नांवर फडणवीस म्हणाले    “मला असं वाटतं की, राहुल गांधी यांचा देशाच्या संविधानावर विश्वास असेल, लोकशाहीवर विश्वास असेल, आणि न्यायालयीन पद्धतीवर विश्वास असेल, तर आतातरी ते महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विषयात बोलणार नाहीत. काल अतिशय विस्तृत निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभं करण्याच काम करणाऱ्यांना पुराव्यासहीत, न्यायासहित, संविधानासहित माननीय उच्च न्यायालायने उत्तर दिलं आहे. काही लोक झोपेच सोंग घेऊन झोपल्यासारखं करतील, तर ये पब्लिक हैं, सब जानती हैं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.





Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून