रमाबाई नगरातील रहिवासी शौचालये, पाण्यापासून वंचित

तोडलेल्या शौचालयांचे काम कुर्म गतीने


मुंबई : घाटकोपर पूर्वेकडील माता रमाबाई आंबेडकर नगरातील तसेच बाजूच्या नालंदा नगरातील रहिवाशांची सोमवारपासून गेले दोन दिवस पाणी आणि शौचालये यासाठी वणवण सुरू आहे. या भागाचा पाणीपुरवठा अचानक बंद झाला. त्यामुळे पाण्याअभावी लोकांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, याबाबत पालिकेचे एन विभागातील संबंधित अधिकारीही प्रतिसाद देत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. या भागातील पाणीपुरवठा सोमवारी सकाळपासून बंद करण्यात आला होता .


त्यामुळे येथील शौचालये ओस पडली होती. त्यामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा आणि गैरसोय झाली. तर दुसरीकडे या भागात काही शौचालये वर्षभरापासून तोडण्यात आल्याने त्यांचीही या हालात भर पडली. मंडळवारी दुपारी काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरू झाला होता. मात्र गढूळ पाणी येत असल्याने नागरिक हैराण झाले होते. अनेकांनी दुकानातून मिनरल वॉटरच्या बाटल्या विकत घेऊन आपली तहान भागवली.


मात्र सर्वांनाच हे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याच्या भावना काहीनी याबाबत बोलताना व्यक्त केल्या. याबाबत पालिकेच्या एन विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्याशी संपर्क साधला. मात्र तो न होऊ शकल्याने याबाबत त्यांच्या प्रतिक्रिया समजू शकल्या नाहीत.


माता रमाबाई आंबेडकर नगरातील प्रियदर्शनी मित्र मंडळ आणि अर्चना स्टोअर्स समोरील सुलभ शौचालय हे मोडकळीस आल्याने गेल्यावर्षी १० ऑगस्टपासून बंद करून नंतर ते तोडण्यात आले. मात्र त्या ठिकाणी आता पायाभरणीही झाली आहे. बांधकाम कुर्म गतीने सुरू असून, आता त्यातील खड्ड्यात लोखंडी सळई टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे हे कधी पूर्ण होणार असा सवाल रहिवासी करत आहेत. तर दुसरीकडे येथील हजारो रहिवाशांची वणवण या भागातील इतर शौचालयांकडे सुरू असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून