वाढीव मतदानासंदर्भातील याचिका फेटाळली

  60

उच्च न्यायालयाचा प्रकाश आंबेडकरांना धक्का


मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर सर्वच विरोधी पक्षांनी शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाला लक्ष्य केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सायंकाळी ६ नंतर वाढलेल्या ७६ लाख मतदारांचा आकडा संशयास्पद असल्याचे म्हटले होते. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर २५ जून रोजी निकाल देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, बुधवारी प्रकाश आंबेडकर यांची याचिका फेटाळताना न्यायालयाचा वेळ वाया घालवला, असे निरीक्षणही नोंदवले आहे.



प्रकाश आंबेडकर यांच्यावतीने ७६ लाख मतदारांचा मुद्दा उपस्थित करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, प्रकाश आंबेडकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकाकर्ते आणि आमचा कालच्या कामकाजाचा वेळ वाया घातला, असे निरीक्षणही हायकोर्टाने निर्णय देताना नोंदवले आहे. त्यामुळे, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आता न्यायालयाने आपला निर्णय स्पष्टपणे दिला आहे.



न्यायालयाच्या निर्णयावर गुरुवारी मांडणार भूमिका


न्यायालयाने निर्णय दिला असून चेतन चंद्रकांत अहिरे यांची याचिका फेटाळली आहे. न्यायालयाकडून हा निकाल अपलोड झाल्यानंतर नेमकी याचिका फेटाळण्याचे कारण काय हे पाहता येईल. त्यानंतरच, मी माझी प्रतिक्रिया देईल असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. गुरुवारी, २६ जून रोजी सकाळी ११.३० वाजता मी मुंबईतील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहे, अशी माहितीही आंबेडकर यांनी दिली.

Comments
Add Comment

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात