मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी एनएचआयला पत्र

व्हाईट टेपिंगच्या निकृष्ट कामामुळे अपघात


तलासरी : मुंबई-अहमदाबादबाद महामार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, माती रस्त्यावर आली आहे, पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे अनेक अपघात होत असून अजून होण्याची शक्यता असल्याने महामार्ग व्हाईट टेपिंगच्या निकृष्ट कामामुळे अपघात होत आहेत, याची दखल घेऊन तलासरी पोलिसांना महामार्गा वरील पूल व रस्त्यावरील खड्डे बुजावीण्यांसाठी महामार्ग प्राधिकरणाला पत्र दिले आहे तलासरी पोलीस स्टेशन हद्दीत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४८ हा सुमारे २१ कि.मी.


गेलेला असुन आच्छाड ते धुंदलवाडी दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट कॉक्रिटीकरणाचे पैच/रॅम्प सोडण्यात आलेले आहेत. सध्या पावसाळयाला सुरुवात झालेली असुन मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४८आच्छाड ते धुंदलवाडी पर्यंत महामार्गाची पाहणी केली असता नमुद ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात होऊन, जिवीतहानी व गाडयांचे नुकसान होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


पोलिसांनी एनएचआयला लिहिलेल्या पत्रात आमगाव ब्रिज वर मुंबई चाहीनी व गुजरात वाहीनी या दोन्ही वाहीनीवर पडलेले खड्डे, मुंबई वाहीनीवर तलासरी पाडवीपाडा येथील कामेश्वर धाबा समोर पडलेले खड्डे सदर ठिकाणी सिमेंट कॉक्रिटीकरणाचे पेंच,रॅम्प असल्याने वारंवार अपघात होत आहेत.


जुने बीएसएनएल ऑफिस जवळुन सर्विस रोड तलासरी नाका पर्यंत पावसाचे पाणी येत असल्याने सदर पाणी येणार नाही या करीता उपाययोजना करणे. मुंबई बाजु जायका हॉटेल समोर खड्डे पडले असुन सदर ठिकाणी माती रस्त्यावर आल्याने एखादा अपघात होण्याची शक्याता नाकारता येत नाही. ह्या ठिकाणी दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या आहेत.


खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत



महामार्गावर खड्डे दुरुस्तीचे व महामार्ग सुरक्षिततेचे काम शासनाने आपणास दिलेले आहे. त्याअर्थी महामार्गाच्या दुरुस्तीची व प्रवासांच्या सुरक्षिततेची जबाबदारी तुमचीच आहे महामार्गावरील रोड खचणे, रोलींग तुटुन अपघात होणे, ही शक्यता नाकारता येत नाही. सदर खड्डयांमुळे झालेल्या अपघातात एखादा दखलपात्र य अदखलपात्र अपराध होण्याची शक्यता आहे. तरी आपण सदर महामार्गावर पडलेले खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत. तसेच अपघात होणार नाहीत याबाबत योग्य त्या उपायोजना कराव्यात, असे नमूद केले आहे.


Comments
Add Comment

कोण असणार शहराचा नवा शिलेदार?

आज दुपारपर्यंत चित्र होणार स्पष्ट सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी गणेश पाटील पालघर :

'प्रहार'च्या जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

निवडणुकीच्या तोंडावर आयात वाढली वसई : शहराच्या राजकारणात सक्रिय असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष

महायुती झाली; आघाडीसाठी खलबत्ते !

सर्वच राजकीय पक्षांचा सोबत लढण्यावर भर विरार : वसई - विरार पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी

महापालिका निवडणुकीसाठी भाजप-सेनेची महायुती

श्रमजीवी आणि आगरी सेनाही सोबत विरार : वसई - विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र

मोखाड्यात अवैध स्फोटकांची विक्री तेजीत

मोखाडा : मोखाड्यात गेले काही महिने स्फोटकांची विक्री बंद झाली होती; परंतु गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा

भाजप-बविआसाठी निवडणूक बेरीज-वजाबाकीची!

गणेश पाटील विरार : वसई - विरारमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष