संजय कपूरचा शेवटचा व्हिडिओ, प्राण वाचवण्याचे डॉक्टरांनी केले होते अनेक प्रयत्न

Sunjay Kapur's Last Video: बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा दिवंगत माजी पती संजय कपूर संबंधित एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, जो त्यांचा मित्र अजित नंदल यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संजय कपूरचा जीव वाचवण्याचे डॉक्टर प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. डॉक्टर संजय कपूरना सीपीआरच्या मदतीने पुन्हा शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते, पण यात ते अयशस्वी ठरले. पोलो खेळताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती, मात्र त्यांनंतर मधमाशी तोंडात जाऊन अन्ननलिकेचा चावा घेतल्यामुळे, निर्माण झालेल्या गुंतगुंतीतून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले गेले. यादरम्यान त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले खरे, पण तरी ते वाचू सजकले नाही. 

दिनांक १३ जून रोजी पोलो सामना खेळताना संजय कपूर यांचे अचानक निधन झाल्याने, त्यांचे कुटुंब आणि करिश्मा कपूरची दोन्ही मुलं समायरा आणि कियान यांना धक्का बसला. त्यांच्या अंत्यविधिला तसेच  शोकसभेला संपूर्ण कपूर कुटुंबीय हजर राहिले. बॉलीवूडचे काही निकटवर्तीय देखील उपस्थित होते. ज्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात संजय कपूर यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाताना दिसतो. हा व्हिडिओ त्यांच्या एका जवळच्या मित्राने शेअर केला आहे.

पहा संजय कपूर यांचा अखेरचा व्हिडिओ



माजी हॉकी खेळाडू अजित नंदल यांनी काही दिवसांपूर्वी संजय कपूर यांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये डॉक्टरांची एक टीम सीपीआरद्वारे त्यांचे प्राण वाचवताना दिसत आहे. अजित नंदल आणि संजय कपूर हे घनिष्ट मित्र होते. अजित नंदलने आपल्या ट्विटर अकाउंटवर संजयचा शेवटचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, 'संजय कपूरचा जीव वाचवतानाचा हा शेवटचा व्हिडिओ. सामना संजय कपूर आणि सज्जन जैसलच्या टीममध्ये होता, सुज्जन नावाचा घोडा देखील तिथे उपस्थित होता. सर्व घोडेप्रेमींसाठी हा खूप दुःखद काळ आहे. तुझ्या आत्म्यास शांती लाभो माझ्या मित्रा.'

अजित नंदल यांनी संजय कपूरच्या निधनावर काय म्हटले?


अजित नंदल यांनी १३ जून रोजी त्यांचा मित्र संजय कपूर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांच्या आठवणीत त्यांनी ट्विटरवर लिहिले, 'घोडेप्रेमींसाठी ही खूप दुःखद सकाळ आहे. एक अद्भुत माणूस, एक महान पोलो खेळाडू, घोडा प्रेमी आणि मनाने सर्वोत्तम व्यक्ती असलेले संजय कपूर यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी इंग्लंडमध्ये निधन झाले. पोलो सामन्यादरम्यान त्यांनी मधमाशी गिळली आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.' 

संजय कपूरचे २००३ मध्ये करिश्मा कपूरशी लग्न झाले होते. नंतर दोघांना समायरा आणि कियान ही दोन मुले झाली. पण २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. संजयचे करिश्मासोबतचे हे दुसरे लग्न होते. करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये प्रिया सचदेव सोबत तिसरं लग्न केलं. संजय यांना तीन पत्नीपासून एकूण चार मुले आहेत. 
Comments
Add Comment

प्रियाकां चोप्राच्या बहिणीने स्वीकारला इस्लाम धर्म ?

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये चमकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या दोन बहि‍णीही मनोरंजनविश्वात चमकत

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती

शिल्पा शिरोडकरचा ‘बिग बॉस १९’ फेम मराठमोळ्या प्रणीत मोरेला पाठिंबा

‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच

पेड पब्लिसिटीवर भडकली यामी गौतम

दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने इंडस्ट्रीमध्ये चालत असलेल्या ‘पेड

‘लग्नपंचमी’च्या निमित्ताने ग्लॅमरस अमृता खानविलकर प्रथमच रंगभूमीवर

‘चंद्रमुखी’ आता ‘सूर्यजा’च्या भूमिकेत! मराठी रंगभूमीवरची दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ला ३० वर्षे पूर्ण

शाहरुख-काजोल यांनी लंडनमध्ये त्यांच्या सिग्नेचर स्टाइलच्या पुतळ्याचे केले अनावरण बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट