मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कुडाळ गावातील माणगाव खोऱ्यात दुचाकीस्वार वाहून गेल्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातारण आहे. अमित धुरी वाहून गेलेल्या तरुणाचं नाव असून त्याच्या सोबत प्रवास करणारा सहकारी सखाराम कानडे हा सुदैवाने बचावला आहे. सदरची घटना रात्री ९ वाजता घडल्यामुळे अनेक तासांपासून एनडीआरएफ पथकाकडून तुरुणाचा शोध सुरु आहे. सोमवारी रत्नागिरीसह इतर भागात पावासाचा जोर वाढला होता.


तसेच वसोली - कुत्रेकोंड कॉजवेवर मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. याच दरम्यान माणगावहून शिवापूरकडे मोटरसायकलने जात असलेले अमित धुरी आणि सखाराम कोनडे यांना कॉजववेरील पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे, पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे मोटारसायकल खाली ओढली गेली. यात अमित धुरी पुलाखाली वाहून गेला.


सखाराम कानडे याने तातडीने आरडाओरड करायला सुरवात केली. परंतू रात्रीच्या वेळी कोणत्याही स्थानिक व्यक्तीने प्रतिसाद दिला नाही. असा वेळी सखारामने काही अंतरावर असलेल्या  दुकानात धाव घेतली आणि झालेली घटना ग्रामस्थांना सांगितली.  त्यामुळे धक्कादायक घटना ऐकल्यानंतर ग्रामस्थांनी आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधला अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.  काही दिवसांपूर्वीच त्याच ठिकाणी वयवृद्ध व्यक्तीला पुरातून वाचवण्यात यश आले होते.


एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती...


तरुण वाहून गेल्याची माहिती कळताचं  आम्ही घटनास्थळी धाव घेतली.  परंतू शोधमोहीम करताना मोठे झाडे - झुडपे आणि पाण्याच्या वेगामुळे अडथळे येत असल्याची माहिती यादव यांनी दिली. बोटी आणि इतर साहित्यांचा वापर करुन देखील अद्यापही तरुणाला शोधण्यास यश आले नाही. ग्रामस्थांच्या मदतीने आणखीण किती काळ शोधमोहीम करावी लागेल याची अद्यापही माहिती नाही. अशी माहिती एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.


Comments
Add Comment

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे

सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला प्रक्रियेत सावळागोंधळ

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी,

जिल्ह्यात २४ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दि. २४ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण

या वर्षीही हापूसची चव उशिराच; आंबा बागायतदार चिंतेत !

लांबलेल्या पावसाचा कोकणातील आंबा उत्पादनावर परिणाम रत्नागिरी (वार्ताहर) : यंदा पावसाने मुक्काम वाढविला आहे. या

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या