Ashadhi Wari 2025 : भोळ्याभाबड्या वारकऱ्यांची फसवणूक! आषाढी वारीत विठ्ठल दर्शनाचे बनावट पास विक्रीचा प्रकार उघड

पालखी सोहळ्यातील ७ वारकऱ्यांची फसवणूक


पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलनामाचा गजर करत वाटचाल करत असताना, काही फसवणूक करणाऱ्या टोळ्यांनी या भक्तिभावाला काळिमा फासणारा प्रकार घडवला आहे. थेट ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या काही भाविकांना मंदिर प्रवेशासाठी बनावट ‘टोकन दर्शन’ पास विकल्याची घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चालत असलेल्या काही भाविकांना तुम्हाला देवाच्या टोकन दर्शनाचे पास १०० रुपयात देतो, असे सांगून सासवड परिसरात जुन्या पासावर हे नवीन डुप्लिकेट पास बनवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र जेव्हा हे भाविक मंगळवारी विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी पोहोचले, तेव्हा प्रवेशद्वारावर स्कॅनिंग करताना ते पास बोगस असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंदिर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत या सात भाविकांना बाजूला घेऊन चौकशी सुरू केली. मात्र, त्यांना हे पास कोणी तयार करून दिले? याबाबत माहिती सांगता आली नाही आले नाही. त्यानंतर प्रशासनाने या भाविकांना पोलिसांकडे पाठवले असून बोगस पास रॅकेट उघड करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे.



बनावट पास बनवून फसवणूक


सध्या आषाढी वारीदरम्यान विठ्ठल दर्शनासाठी भाविकांना १० ते १२ तासांपर्यंत रांगेत थांबावे लागते, तर अधिकृत टोकन प्रणालीमुळे अर्ध्या तासात थेट दर्शनाचा लाभ मिळतो. याचाच गैरफायदा घेत काही भामटे बनावट पास बनवून फसवणूक करत आहेत. फसवणूक झालेल्या भाविकांनी सांगितले की, सासवडच्या दरम्यान त्यांना हे पास मिळाले. त्यामुळे हा प्रकार वारीच्या मार्गातच कुठे तरी घडत असल्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या प्रकरणी कडक भूमिका घेतली असून, यापुढे कुणीही असे पास विकताना आढळल्यास गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी सर्व भाविकांना अधिकृत संकेतस्थळावरूनच मोफत टोकन बुक करण्याचे आणि अशा बनावट पासांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.



 १० दिवस मांस विक्रीवर बंदी


आषाढी वारीचा पावन सोहळा जवळ येत असून, लाखो वारकरी पालख्या घेऊन पंढरीच्या दिशेने आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले आहेत. या वारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी उघडपणे मास-मटन विक्री करणारी दुकाने दिसून येतात. अगदी पंढरपूरमध्ये प्रवेश करतानाही विविध मार्गांवर अशी दुकाने आढळतात. गेल्या अनेक वर्षांपासून पालखी सोहळ्याचे प्रमुख आणि वारकरी संप्रदायातील संत मंडळी यात्रा कालावधीत पंढरपूर शहर तसेच पालखी मार्गावरील गावांमध्ये मास-मटन विक्री बंद ठेवावी, अशी मागणी करत होते. या वर्षी अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून, आषाढी वारीच्या इतिहासात प्रथमच, यात्रेच्या कालावधीत सलग १० दिवसांसाठी पंढरपूरमध्ये मास-मटन विक्रीवर बंदी घालण्यात आल्याची घोषणा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे. ही बंदी लागू केल्यामुळे वारकरी संप्रदायात आनंदाची भावना व्यक्त केली जात असून, वारीचे पावित्र्य आणि भक्तिभाव जपण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी