प्रहार    

धक्कादायक ! रेल्वे अपघातात ७२००० जणांचा गेला जीव, माहिती अधिकारातून आकडेवारी स्पष्ट...

  57

धक्कादायक ! रेल्वे अपघातात ७२००० जणांचा गेला जीव, माहिती अधिकारातून आकडेवारी स्पष्ट... मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असणाऱ्या रेल्वेची धक्कादायक माहिती समोर आली. आतापर्यंत रेल्वे अपघातात ७२००० जणांचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यातील १५०० मृत्यूदेह बेवारस असल्याची माहिती, माहिती अधिकारातून स्पष्ट झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा,कर्जत, चर्चगेट ते विरार,डहाणू रोड, सीएसएमटी ते वाशी, पनवेल अशा सर्व मार्गावरील हे अपघाती  मृत्यू आहेत. मुंबईतील प्रसिध्द डाॅक्टर सुरोश मेहता यांनी माहिती अधिकारातून रेल्वेरुळांवरील अपघात, बेवारस मृतदेह, यांची माहिती मागवली होती.

यापूर्वी  रेल्वेचा रुळ ओलंडताना २००२ ते २०२४ दरम्यान ७२ हजार ५२४ रेल्वे पोलिसांच्याकडे अपघाती रेल्वे मृत्यूची नोंद आहे, त्यातील २००९ ते २०२४ या वर्षात १४००० हून अधिक मृतदेहांची ओळख पटलेली नसल्याने ते बेवारस स्थितीत होते. अशी बाब माहिती अधिकाऱ्यातून स्पष्ट झाली.  रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या लोकांची ओळख पटवणे अशक्य आहे.

त्यातील बरेच मृतदेह  विच्छिन्न अवस्थेत असतात. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे अवघड आहे. रेल्वे अपघातात मृत्यू पडलेल्या प्रवाशांच्याकडे कोणतेही वस्तू सापडत नाही. तसेच ज्या मृतदेहाची ओळख पटली तर त्यांच्या नातेवाईकांपर्यंत मृतदेह पोहचवता येत नाही. अशी रेल्वे पोलिसांनी माहिती दिली.तसेच ज्या रेल्वे अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.त्यांचा मृत्यूदेह शवगृहात एक महिना ठेवला जातो. रेल्वे पोलिस खात्याअंतर्गत त्याच्या नातेवाईकाने हरवलेली व्यक्तीची कोणत्याही पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली का ? याचा देखील तपशील तपासाला जातो.

रेल्वे अपघातातील आकडेवारी माहिती अधिकारातून स्पष्ट - 

रेल्वे रूळ ओलांडताना ४३,४२८
धावत्या लोकलमधून पडणे १४,३९६
अन्य १३,९४१
रेल्वे खांबाला धडक ४५६
फलाट आणि पायदान यांच्या पोकळीत पडून ३०३
एकूण ७२,५२४

पाच वर्षांतील बेवारस मृतांची संख्या

वर्ष बेवारस मृतदेह आप्त-नातेवाइकांना परत देण्यात आलेले मृतदेह
२०२० ---८२८ ---२८८
२०२१ ---१२७९ ---४७३
२०२२ ---१८१८ ---६८९
२०२३ ---१८७२ ---७१८
२०२४ ---१८६४ ---६०४

 

 

 

 

 
Comments
Add Comment

चार्जिंगअभावी ५१ एसी बस आगारातच

इलेक्ट्रिक बसच्या बॅटरी चार्ज करण्याची सुविधाच नाही मुंबई  : मुंबईत बेस्ट बसगाड्यांच्या कमी संख्येमुळे

मुंबई महापालिकेच्या आता ‘संपर्क स्मार्ट शाळा’

१८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना होणार लाभ मुंबई : महाराष्ट्र राज्य आणि संपर्क फाउंडेशन यांच्या समन्वयाने

मुसळधार पावसामुळे सातही तलावांच्या पाणीपातळीत वाढ

जलाशयातील पाणीसाठा पोहोचला ८९ टक्क्यांवर मुंबई : मुंबईतील पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याची

शिवाजी पार्क मैदानातील कचरा पेट्या गायब

मुंबई : मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजीपार्क

'अन्नपदार्थांच्या पॅकिंगसाठी वर्तमानपत्राच्या कागद वापरु नका '

अन्न व औषध प्रशासनाची सूचना मुंबई : अन्नपदार्थ ग्राहकांना देताना त्याच्या पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर करू

परळच्या उड्डाणपुलाची लवकरच दुरुस्ती होणार!

मुंबई : 'बृहन्मुंबई महानगरपालिका' पावसाळ्यानंतर परळ 'टीटी ब्रिज' उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आणि