Nitin Gadkari Stucks in Traffic Jam: केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरीच अडकले वाहतूक कोंडीत; दौरा करावा लागला रद्द

पुणे: वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या प्रकल्पाच्या पाहणीसाठी गेलेले केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. (Nitin Gadkari Stucks in Traffic Jam) देशभरात रस्त्यांचं जाळ निर्माण करणारे मंत्री म्हणून नितीन गडकरी यांची ओळख आहे. मात्र आज पुण्यात ते स्वत: वाहतूक कोंडीत अडकले होते. इतकंच नाही तर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे त्यांना त्यांचा पाहणी दौरा रद्द करावा लागला. चक्क वाहतूक मंत्र्यांनाच असा ट्रॅफीकचा सामना करावा लागल्याने याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे.



नेमकं काय घडलं?


पुण्यातील शनिवार वाडा ते स्वारगेट पर्यंत भुयारी मार्गाचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित भुयारी मार्गासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा पाहणी दौरा आज आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार नितीन गडकरी शनिवार वाडा येथे पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. पण या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांब रांगा लागल्या. यात नितीन गडकरींची गाडीच अडकून पडली. ट्राफिक इतकी होती की, त्यांची गाडी पुढे जातच नव्हती. शेवटी वाहतूक पोलिसांनी ही कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना देखील ते शक्य झाले नाही. ज्यामुळे, नाईलाजास्तव नितीन गडकरी यांना पाहणी दौरा रद्द करावा लागला. यासंबंधीत कार मधूनच त्यांनी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.



पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याबाबतचे निवेदन लवकरच जाहीर करण्याचे आश्वासन


पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दररोजचा विषय बनली आहे. पुणेकरांना याचा दररोज सामना करावा लागतो. त्याचा फटका आज खुद्द नितीन गडकरींना बसला आहे. दरम्यान या वाहतूक कोंडीला पोलीस आणि स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचं स्थानिक आमदार रासने यांनी म्हटलं आहे. पोलीस आणि पालिका प्रशासन यांच्यात योग्य समन्वय नसल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याबाबतचे निवेदन देऊन लवकरच यासंदर्भात बैठक घेऊ, असं आश्वासन नितीन गडकरी यांनी दिलं आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या