पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना ५ दिवसांची एनआयए कोठडी

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्था अर्थातच एनआयएला रविवारी मोठे यश मिळाले होते. पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत आणि


आश्रय दिल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्थेने दोघांना अटक केली होती. सोमवारी एनआयएने या दोन्ही आरोपींना जम्मूच्या सत्र न्यायालयात रिमांडसाठी हजर केले.


जम्मूच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रितेश कुमार दुबे यांच्या न्यायालयात दोन्ही आरोपींना हजर करण्यात आले. यानंतर पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत आणि आश्रय दिल्याबद्दल अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पाच दिवसांसाठी एनआयएच्या कोठडीत पाठवले आहे.


रविवारी पहालगाममधील बटकोट येथील रहिवासी परवेझ अहमद जोथर आणि पहलगाममधील हिल पार्क येथील रहिवासी बशीर अहमद जोथर यांना एनआयएने अटक केली होती.

Comments
Add Comment

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था