धक्कादायक! पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी नाडियामध्ये बॉम्बस्फोटात ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे दिले आश्वासन


कोलकाता : पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यात सोमवारी एका धक्कादायक घटनेत ९ वर्षीय मुलीचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. कालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी हा दुर्दैवी बॉम्बस्फोट झाला आहे.


कालीगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील या भागात दुपारच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये या निरपराध मुलीला जीव गमवावा लागला.


पोलिसांच्या म्हणण्यानुसार, "मुलीला बॉम्बने जबर दुखापत झाल्या होत्या. हा स्फोट कालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी घडला."



मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर तीव्र धक्का व्यक्त करत एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केले: "बारोचंदगर येथील स्फोटात एका मुलीचा मृत्यू झाल्याने मला धक्का बसला आहे आणि मनापासून दुःखी आहे. या दुःखाच्या वेळी माझी प्रार्थना आणि विचार त्यांच्या कुटुंबासोबत आहेत." त्यांनी पुढे म्हटलेय की, "पोलिस लवकरात लवकर गुन्हेगारांवर कडक आणि निर्णायक कायदेशीर कारवाई करेल."


पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. स्फोटाच्या कारणांची तपासणी सुरू आहे. या प्रकरणी सखोल चौकशी केली जात आहे


हा स्फोट कालीगंज विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी घडला असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


मतमोजणी केंद्राजवळ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते, परंतु या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


या निरपराध मुलीच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात दुःखाची लाट पसरली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कडक कारवाईचे आश्वासन दिले असून, पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी