Pandharpur Wari : वारकऱ्यांचं जेवणाचं मॅनेजमेंट कसं असतं?

कशी केली जाते खाणपानची तयारी?


काही जणी कणिक मळतात. कुणी ​ चपात्या लाट​तय. कोण भाजी निवडतयं​, असं चित्र तुम्हाला वारीच्या मुक्कांमी असलेल्या तंबूत दिसतयं. आपापल्या दिंडीमधल्या वारकऱ्यांसाठी दिंडीप्रमुखांनी अचूक नियोजन केलेलं असतं. लाखो वैष्णावात कोणीही उपाशी राहत नाही. कारण स्वयंपाक साहित्य ट्रक सोबत असतं. ​मुक्कामा स्थळी वारकरी पोहोचण्यासाठी जेवण म्हणजे खाण्या पिण्याची ​आधीच तयारी करून ठेवलेली असते.



वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला संप्रदाय आहे. वारकरी म्हणजे नित्यनियमाने वारी करणारा भक्त. ​राज्याच्या कानाकोपऱ्यांतून वारकरी आपल्या पालख्यासह आळंदी ते पंढरपूर पायी चालत आहेत. भर पावसात चालणाऱ्या वारकऱ्यांच्या जेवणाची कशी होते व्यवस्था? याबद्दल अनेकांना कुतूहल असतं. प्रत्येक मार्गावर अंदाजे २०० दिंड्या ​ असतात​. ज्यात ४००-५०० ट्रक असतात. मिरवणुकीच्या मध्यभागी मुख्य पालखी असते, प्रत्येक गटाचा एक निश्चित क्रमांक आणि क्रम असतो जो काटेकोरपणे पाळला जातो.



प्रत्येक गटाकडे एक ट्रक असतो जिथे त्यांचे सामान आणि अन्न साहित्य ठेवले जाते. पहाटेच्या वेळी या ट्रकना शांतपणे बाहेर पडावे लागते... लवकर झोपणे आणि लवकर उठणे, हे त्यांच्यासाठी गुप्त ऊर्जा सूत्र ​असतं. ​​तंबूमध्ये मुक्काम करणाऱ्या वारकऱ्यांना पहाटे तीनच्या सुमारास उठावे लागते. लवकर उठून, तंबू पाडून, सर्व सामान भरून ट्रक पुढे पाठवले जातात. ​या ट्रक किंवा ट्रेम्पोमध्ये ​ दिंडीप्रमुख स्वतःचा​ जीवनावश्यक साठा सोबत ​ठेवतात. त्यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, मसाले, तेल​ या गोष्टींचा समावेश असतो.



वारीतील खानपान व्यवस्थेचे स्वरूप​ कसं असतं ते पाहूया



  • प्रत्येक दिंडी आपल्या वारकऱ्यांसाठी जेवण, निवास आणि इतर आवश्यक सोयींची व्यवस्था करते.

  • ज्या गावात वारीतील दिंड्या मुक्काम करतात, त्या गावचे लोक वारकऱ्यांसाठी जेवण, पाणी आणि इतर सोयी पुरवतात.

  • वारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. तिथे वारकरी स्वतःचे जेवण बनवतात किंवा स्थानिक लोक जेवण बनवून देतात.

  • अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी प्रसाद​ म्हणजे ​जेवणाची​ व्यवस्था केलेली असते. तिथे वारकऱ्यांना फराळ किंवा जेवण दिले जाते.

  • वारीतील खानपान व्यवस्था ही एक सामुदायिक जबाबदारी आहे. दिंडी, स्थानिक लोक आणि वारकरी मिळून ही व्यवस्था यशस्वीपणे पार पाडतात.

  • वारीमध्ये सहभागी होणारे सर्व वारकरी आनंदाने आणि उत्साहाने वारीचा आनंद घेतात.

Comments
Add Comment

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या

बीडमध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

बीड : बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

माजी उपसरपंचाच्या आत्महत्येनंतर नर्तिका पूजा गायकवाडच्या फॉलोअर्समध्ये वाढ!

बीड: बीडच्या गेवराईतील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःवर गोळी झाडून

कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये; मंत्री छगन भुजबळ यांचे ओबीसी बांधवांना आवाहन

ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबियांचे भुजबळांनी केले सांत्वन, म्हणाले... लातूर: मनोज

रेशनच्या तांदळात आढळला मृत साप

सोलापूर : सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मागील दोन