शिर्डीतील साईंच्या व्हीआयपी दर्शनाला ब्रेक

सामान्य भाविकांना मोकळे साईदर्शन


शिर्डी : शिर्डी येथील श्री साई संस्थान मंडळाच्या तदर्थ समितीने भाविकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे.आता कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तींच्या ( व्हीआयपी ) दर्शनासाठी ठरावीक 'ब्रेक दर्शन' वेळापत्रक लागू केलं जाणार असून त्याव्यतिरिक्त समाधी मंदिरातील दर्शन रांगेत अडथळा होणार नाही, अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.



दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांच्या ( व्हीआयपी ) अचानक येण्याने सर्वसामान्य साईभक्तांच्या दर्शन रांगेत वारंवार व्यत्यय येत होता. आता ही मनमानी बंद होणार असून ठराविक वेळेतच व्हीआयपी दर्शन होणार आहे. साईसंस्थानने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार, शिफारस पत्र घेऊन येणाऱ्या व्हीआयपी भाविकांसाठी दिवसभरात अडीच तास राखीव ठेवण्यात आले आहे. या राखीव वेळेतच त्यांना पाच घेऊन दर्शन मिळणार आहे त्यामुळे सर्वसामान्य भाविकांची दर्शना बिना अडथळा दिवसभर सुरू राहील. अति महत्त्वाच्या व मोठे दान देणाऱ्या साई भक्तांना मात्र या नियमातून सूट देण्यात आली आहे.


सकाळी ९ ते १०, दुपारी २;३० ते ३:३०, रात्री ८ ते ८:३०, ही 'ब्रेक दर्शन' व्यवस्था समाधी मंदिराच्या एका बाजूने केली जाणार असून त्यामुळे सामान्य दर्शनरांग थांबणार नाही आणि अन्य भक्तांची गैरसोय होणार नाही, असं संस्थानच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.


अतिमहत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच दर्शनाची मुभा राहणार आहे. यामध्ये भारताचे आजी-माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, सर्व राज्यांचे राज्यपाल, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि न्यायमूर्ती, लोकसभा अध्यक्ष/उपाध्यक्ष, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार,१ लाख किंवा त्याहून अधिक देणगी देणारे साईभक्त, नामवंत उद्योगपती, आंतरराष्ट्रीय खेळाडू, सिनेअभिनेते, शास्त्रज्ञ, संस्थानचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा समावेश असणार आहे.

Comments
Add Comment

ओबीसी समाजासाठी मिनी महामंडळांची स्थापना, मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर :  विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण

मुंबई उपनगरातील 'पागडी' धारकांचा मुद्दा विधानसभेत

​मुंबई शहराचा कायदा उपनगराला लागू करण्याची आमदार मनीषा चौधरी यांनी मागणी​ नागपूर  : ​भाजपच्या आमदार मनीषा चौधरी

दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी सोसायटीची एनओसी बंधनकारक -उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर : राज्यात एफ.एल–२  आणि सी.एल–३  परवानाधारक विदेशी व देशी दारू किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतरासाठी

बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओची कारवाई

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठी मोहीम राबवणार ठाणे : ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, नियमभंग आणि बेशिस्त

'ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक भरती करा'

नागपूर : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये जिथे शून्य ते दहा किंवा शून्य वीस विद्यार्थी आहेत अशा अनेक

शक्ती कायदा मंजुरीविना राज्याकडे परत!

नागपूर : मविआ सरकारच्या काळात संमत झालेला शक्ती कायदा मंजुरीविना राज्याकडे परत पाठविण्यात आला आहे. शक्ती