धक्कादायक! पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी नाडियामध्ये बॉम्बस्फोटात ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे दिले आश्वासन


कोलकाता : पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यात सोमवारी एका धक्कादायक घटनेत ९ वर्षीय मुलीचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. कालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी हा दुर्दैवी बॉम्बस्फोट झाला आहे.


कालीगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील या भागात दुपारच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला, ज्यामध्ये या निरपराध मुलीला जीव गमवावा लागला.


पोलिसांच्या म्हणण्यानुसार, "मुलीला बॉम्बने जबर दुखापत झाल्या होत्या. हा स्फोट कालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी घडला."



मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर तीव्र धक्का व्यक्त करत एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केले: "बारोचंदगर येथील स्फोटात एका मुलीचा मृत्यू झाल्याने मला धक्का बसला आहे आणि मनापासून दुःखी आहे. या दुःखाच्या वेळी माझी प्रार्थना आणि विचार त्यांच्या कुटुंबासोबत आहेत." त्यांनी पुढे म्हटलेय की, "पोलिस लवकरात लवकर गुन्हेगारांवर कडक आणि निर्णायक कायदेशीर कारवाई करेल."


पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. स्फोटाच्या कारणांची तपासणी सुरू आहे. या प्रकरणी सखोल चौकशी केली जात आहे


हा स्फोट कालीगंज विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी घडला असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


मतमोजणी केंद्राजवळ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते, परंतु या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


या निरपराध मुलीच्या मृत्यूने संपूर्ण राज्यात दुःखाची लाट पसरली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कडक कारवाईचे आश्वासन दिले असून, पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment

Punjab : महागाई भत्त्यासाठी पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; सचिवालयाचे कामकाज ठप्प

चंदीगड : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याच्या (DA) मागणीसाठी पंजाबमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी

Karnataka teachers suspended : RSS च्या पथसंचालनात सहभाग घेणं पडलं महाग! कर्नाटकातील २ सरकारी शिक्षकांवर निलंबनाची मोठी कारवाई

कर्नाटक : कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यात शिक्षण विभागाने दोन सरकारी शिक्षकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली

Raksha Bandhan : राष्ट्रपतींसह अन्य नेत्यांनी देशवासीयांना रक्षाबंधन सणाच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह

PMJDY :'प्रधानमंत्री जन धन योजने'ला 12 वर्षे पूर्ण, 59.09 कोटी खाती उघडली, 3.17 लाख कोटी रुपये जमा

56% खातेधारक महिला आहेत तर 78% खाती ग्रामीण व निम-शहरी भागांमधील आहेत देशभरात डिजिटल पेमेंट आणि आर्थिक

USA Murder Case : अमेरिकेत प्रेयसीची हत्या केली, भारतात ठिकाना लावला...अन् आरोपीला आग्र्यातून अटक!

अमेरिकेत आपल्या प्रेयसीची भयंकर हत्या करून भारतात पळून आलेल्या एका आरोपीला आग्रा येथून पोलिसांनी अटक केली आहे.

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि