Abu Azami Wari Controversy: 'हिंदू सण रस्ता अडवतात, पण आम्ही गप्प राहतो', पंढरपूर यात्रेवर अबू आझमीचे वादग्रस्त विधान

सोलापूर: महाराष्ट्रात वारकऱ्यांच्या पालखी सोहळा सुरू असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azami) यांनी पंढरपूर यात्रेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम व्यक्ती विरोध करत नाहीत. मात्र मुस्लिमांनी नमाज केल्यावर तक्रारी केल्या जातात असं विधान आझमी यांनी केले आहे.



नेमके काय म्हणाले अबू आझमी?


समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले, "वारीमुळे रस्ते जाम होतात. जेव्हा हिंदू सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम कधीही विरोध करत नाहीत, परंतु जेव्हा मुस्लिम नमाज पठण करतात तेव्हा तक्रारी केल्या जातात. आम्ही नेहमीच हिंदू बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून चालतो. आजपर्यंत कोणत्याही मुस्लिमाने हिंदू सणांमुळे रस्ता बंद असल्याची तक्रार केलेली नाही, परंतु जेव्हा मशिदीत नमाज पठण केले जाते तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात की जर बाहेर नमाज पठण केले तर पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जातील.".  ते पुढे म्हणाले की, "आज मी सोलापूरला येत असताना मला सांगण्यात आले की पालखी येणार आहे, लवकर निघा, नाहीतर रस्ता जाम होईल. वारीमुळे वाहतूक कोंडी होते पण आम्ही कधीही विरोध केला नाही. मुस्लिमांसाठी जमीन जाणूनबुजून दिली जात नाही". समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी रविवारी सकाळी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी हे वरील विधान केले. 


नमाज पठणामुळे होणाऱ्या गर्दीची तुलना वारीशी केल्यामुळे, महाराष्ट्रातील लाखों वारकरी आणि विठ्ठल भक्तांचा रोष त्यांना पत्करावा लागणार असून, या प्रकरणावर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालख्या पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ


संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी सध्या पुण्याहून पंढरपूरकडे रवाना होत आहे. अशा परिस्थितीत, अबू आझमी यांच्या या विधानामुळे राजकीय वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. पंढरपूर वारी ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि श्रद्धेशी संबंधित वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे, ज्यामध्ये लाखो संख्येने भाविक संतांच्या पालख्यांसह पंढरपुरी पायी प्रवास करतात.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये