पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी दोघांना अटक

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे धर्म विचारुन २६ नागरिकांची हत्या केली होती. या अतिरेकी हल्ला प्रकरणी एनआयएने पहलगाम येथे राहणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. अतिरेक्यांना आश्रय दिल्याचा आरोप ठेवून दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांची नावं अनुक्रमे परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर अशी आहेत. एनआयएने परवेझ आणि बशीर या दोघांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ च्या कलम १९ अंतर्गत अटक केली आहे.

अतिरेकी हल्ला करणाऱ्यांपैकी तीन जणांची ओळख पटली आहे. बंदी असलेल्या लष्कर - ए - तोयबा या अतिरेकी संघटनेशी संबंधित असलेल्या या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे. हल्लेखोर अतिरेकी पाकिस्तानचे नागरिक होते. परवेझ आणि बशीर या दोघांनी अतिरेक्यांच्या राहण्याची तसेच त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. हल्ला करण्याआधी अतिरेकी हिल पार्क येथील एका घरात वास्तव्यास होते. ही व्यवस्था परवेझ आणि बशीर यांनीच केलीच होती. हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेली वेगवेगळ्या प्रकारची मदत परवेझ आणि बशीर या दोघांनीच पुरवली होती.

पहलगाम येथे अतिरेकी हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. भारताने पहलगाम अतिरेकी हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांचे तळ नष्ट करण्यात आले.
Comments
Add Comment

जम्मू–काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर; आंतरराष्ट्रीय सीमेच्या जवळ घुसखोरीचा संशय

जम्मू : जम्मू–काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेच्या (IB) जवळ घुसखोरीचा संशय निर्माण झाल्यानंतर

ज्या संस्कृती इतरांना नष्ट करू पाहतात, त्या स्वतःच नष्ट होतात!

सोमनाथ स्वाभिमान पर्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश सोमनाथ : ज्या संस्कृती इतरांना नष्ट करू पाहतात, त्या

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि