मुंबईत अग्नितांडव, घाटकोपर इमारतीला मध्यरात्री भीषण आग, १३ जण जखमी...

मुंबई :  मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत १३ जण जखमी झाले आहेत. ऑर्किड टॉवर येथे ही भीषण आग लागल्याची माहिती आहे. ऑर्किड टॉवरच्या बिल्डिंग नंबर सहाच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते.

तेथील स्थानिक लोकांच्या माहितीनुसार घाटकोपर परिसरातील पंतनगर भागात असेलल्या रमाबाई कॉलनीमधील शांती सागर इमारतीत रात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागलेली होती. या इमारतीच्या विद्युत मीटर केबिनमध्ये आग लागली असल्यामुळे इमारतीतील वायर जळून खाक झाल्या. ही आग लागल्यानंतर इमारतीतील भयभीत झालेल्या लोकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. आग लागल्यानंतर लोकांची पळापळ सुरु झाली, त्यामुळे काही इमारतीच्या मजल्यावर लोक अडकले होते.

शांतीसागर इमारतीत आग लागल्याची माहिती मिळताच अग्नीशामक दलाने तातडीने घटना स्थळी धाव घेतली. अग्नीशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करुन ही आग तीड तासात आटोक्यात आणली. या आगीत १३ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. जखमी झालेल्या रुग्णांमध्ये ८ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. यातील १२ जणांवर उपचार सुरु आहेत, जखमी झालेल्या एका रुग्णाची प्रकृती ठिक असल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Comments
Add Comment

शेअर बाजारातील प्राथमिक मार्केट...

डॉ. सर्वेश सुहास सोमण आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खासगीरीत्या आयोजित

अरेरे! १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वैष्णोदेवी यात्रेला पुन्हा लागला ब्रेक

जम्मू काश्मीर: १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या माता वैष्णोदेवीच्या यात्रेला पुन्हा एकदा पुढील आदेश येईपर्यंत

आरोहच्या अंतर्मनातील महापूर

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल रेगे चित्रपटाने प्रसिद्धीस आलेला कलाकार म्हणजे आरोह वेलणकर. महापूर नावाचं नाटक तो

itel A90 लिमिटेड एडिशन लाँच मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शनसह ७००० रूपयांत लाँच

MIL STD 810H - सह मिलिटरी-ग्रेड टफनेस आणि धूळ, पाणी आणि थेंब प्रतिरोधकतेचे 3P कंपनीकडून आश्वासन परवडणाऱ्या किमतीत

आधी वंदू तुज मोरया...

महाराष्ट्रात आणि देशातही घराघरांत पोहोचलेला आणि आबालवृद्धांचा आराध्य दैवत गणेशोत्सवाची सुरुवात आजपासून

ST Corporation Decision : एसटी मालवाहतूक सेवा बंद करण्याचा महामंडळाचा निर्णय...

मुंबई : करोना काळात एसटी महामंडळाचे आर्थिक उत्पादनात (ST  वाढ व्हावी यासाठी महामंडळाने मालवाहतूक सेवा सुरु केली