शाहरुख खानच्या मन्नत नूतनीकरणात सीआरझेडचे उल्लंघन?

वन विभागासह पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली संयुक्त पाहणी


मुंबई : चित्रपट अभिनेता शाहरुख खान यांच्या वांद्रे पश्चिम येथील मन्नत बंगल्याच्या बांधकामामध्ये सीआरझेड आणि खारफुटीची जागा तसेच हेरिटेज विभागांमध्ये असल्याने नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आता शनिवारी मॅग्रोज सेल आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या बंगल्याची संयुक्तपणे पाहणी केली. या संयुक्त पाहणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मन्नतच्या बांधकामांमध्ये नियमांचे उल्लंघन झाले किंवा कसे याबाबत स्पष्ट होईल आणि पुढील कार्यवाही केली जाईल,असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


मन्नत बंगल्याच्या नुतनीकरणाच्या कामांमध्ये कोस्टल रेग्युलेशन झोन अर्थात सीआरझेड या तसेच हेरिटेज आणि मॅग्रोजबाबतच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रारी महापालिकेला तसेच संबंधित विभागांमध्ये प्राप्त झाली होती. त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या इमारत व कारखाना विभागाच्या सहायक अभियंत्यांसह संयुक्तपणे पाहणी केली. या बांधकामाची स्थळ पाहणी केल्यानंतर अहवाल संबंधितांचा सादर केला जाणार आहे.


मात्र, सीआरझेडनुसार तिवरांच्या बाबत ही तक्रार असली तरी यामध्ये कोणत्याही प्रकारे बांधकाम आराखड्या व्यतिरिक्त बांधकाम केल्याची तक्रार प्राप्त झालेली नाही. त्यामुळे महापालिकेकडे अनधिकृत बांधकामाची तक्रार नसल्याने सध्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.