बालनाट्य टिकलं पाहिजे

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल 


अंजू उडाली भुर्रर्र हे बालनाट्य सध्या चर्चेत आहे. त्या बालनाट्यामध्ये महत्त्वाची चेटकिणीची भूमिका साकारणारी कलावंत देखील चर्चेत आहे. लहान मुले सुरुवातीला तिला पाहून घाबरतात, नाटक बघण्यास नकार देतात, नाट्यगृहाच्या बाहेर जाण्याचा आग्रह धरतात; परंतु पालकांनी समजविल्यानंतर ते पूर्ण नाटक बघतात. चेटकणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांना घाबरविणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव आहे पूर्णिमा अहिरे.


दादरच्या किंग जॉर्ज शाळेमध्ये पूर्णिमाचे शालेय शिक्षण झाले. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांनी भाग घेतला होता. यानंतर त्यांनी पुढे माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. पुढे त्यांनी नाट्यवलय जॉइन केलं. तिथे ऑडिशन दिल्यावर त्यांचे सिलेक्शन झाले. तेथे संजय नार्वेकरने त्यांना अभिनय शिकवला.


त्यानंतर त्यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. संतोष पवार दिग्दर्शित असा मी अशी मी या नाटकात त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांच्या यदा कदाचित या नाटकात त्यांनी केलेली गांधारीची भूमिका खूप गाजली. आजही प्रेक्षक, अभिनेते त्यांना गांधारी नावानेच ओळखतात. आजही सचिन पिळगावकर त्यांना गांधारी नावानेच हाक मारतात. श्यामची मम्मी, जाऊ बाई जोरात ह्या नाटकात त्यांनी कामे केली. त्यानंतर काही मालिकेत देखील त्यांनी कामे केली. वहिनीसाहेब, अवघाची संसार या त्यांनी काम केलेल्या मालिका गाजल्या. त्यांनी केलेले पछाडलेला, अगं बाई अरेच्चा हे चित्रपट गाजले.


अंजू उडाली भुर्रर्र हे राजेश देशपांडे दिग्दर्शित बालनाट्य सध्या सुरू आहे. यामध्ये वाईट चेटकणीच्या भूमिकेत त्या आहेत. लहान मुले त्यांना सुरुवातीला पाहून घाबरतात; परंतु नंतर हळूहळू ते त्या नाटकात रमू लागतात. अंजू नावाची मुलगी उडून जाते, नंतर तिला चेटकीण भेटते. शेवटी ती परत कशी येते. हे सारे या नाटकात पाहायला मिळेल. बाल दोस्तांसाठी हे बालनाट्य म्हणजे एक मनोरंजनाचा खजिना आहे.


बालनाट्याला बुकिंग मिळत नाही, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. बालनाट्य टिकले पाहिजे. आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. बालदोस्तांची मेहनत असते, आम्हा कलाकार, दिग्दर्शक, नाटकातील इतर घटकांची देखील मेहनत खूप महत्त्वाची असते. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी बालनाट्य टिकले पाहिजे.

Comments
Add Comment

संवेदनशील आठवणींची 'पंढरीची वारी'

राजरंग-राज चिंचणकर पंढरीच्या रायाशी संबंधित अनेक कलाकृती विविध माध्यमांतून आतापर्यंत सादर झाल्या आहेत. रूपेरी

आषाढीच्या महिन्यात पंढरपूर अप्रतिम

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल  सावळ्याची जणू सावली’ या झी मराठी चॅनेलच्या मालिकेतील सावलीची भूमिका साकारून

शेंगा, रानभाजी आणि बरंच काही...!

भालचंद्र कुबल-पाचवा वेद  काही वर्षांपूर्वी गजेंद्र अहिरेंचं शेवग्याच्या शेंगा नावाचं, संजय मोने आणि स्वाती

‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामुळे वेगळीच अनुभूती

  टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल    मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामध्ये अश्वत्थामाचा ज्वलंत जीवनपट

एका रंगकर्मीची 'विठ्ठल वारी'...

राजरंग-राज चिंचणकर   पंढरीच्या वारीत असंख्य वारकरी सामील होत आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी लीन होतात. या

उजळमाथ्याने फिरणाऱ्या प्रत्येक गॉसिपकारास...!

भालचंद्र कुबल-पाचवा वेद   नाटक उजळवणाऱ्या प्रत्येक प्रकाशयोजनाकारास मी नेहमी पहिलं वाक्य ऐकवतो, "रिस्पेक्ट