Ashadhi Wari 2025 : वारीत ३५ हजार भाविकांसाठी वॉटरप्रूफ दर्शन मंडप!

पंढरपूर : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं दैवत असलेल्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येत असतात. येत्या ६ जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरीत येणार आहेत. मंदिर समितीने वारकरी भाविकांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे. यावर्षी श्री विठ्ठल- रुक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर समितीने विशेष सोय केली आहे. मंदिर समितीकडून सुमारे ३५ हजार भाविक दर्शनरांगेत उभारतील व बसतील, असा भव्यदिव्य वॉटरप्रूफ दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. शिवाय दर्शन रांगेतील भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी, चहा आणि जेवणाची सोयसुद्धा केली आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.




४५० फूट लांब व १०० फूट रुंद मंडप


आषाढी वारीसाठी सुमारे १५ ते १६ लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार मंदिर समितीने दर्शनरांगेचे नियोजन केले आहे. वारी काळात पाऊस येण्याची शक्यता गृहीत धरून भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी यंदा प्रथमच वॉटरप्रूफ दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. येथील पत्राशेड जवळच्या मोकळ्या जागेत ४५० फूट लांब व १०० फूट रुंद असा भव्य मंडप टाकला आहे.



भाविकांनी रांगेतूनच घ्यावे देवाचे दर्शन


विठ्ठल- रुक्मिणीचे २४ तास दर्शन येत्या २६ जूनपासून सुरू होणार आहे. ते प्रक्षाळ पूजेपर्यंत सुरू राहील. या काळात जास्तीत जास्त भाविकांचे सुलभ व जलद गतीने दर्शन व्हावे यासाठी दर्शनरांगेचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले आहे. दर्शनरांगेत २४ तास सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ठिकठिकाणी भाविकांसाठी स्वच्छतागृहांची देखील सोय केली आहे. सध्या व्हीआयपी व ऑनलाइन दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांनी दर्शन रांगेतून देवाचे दर्शन घ्यावे, असे आवाहनही गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणात सरासरी ११.१ टक्के वाढ

ठाणे : नागरिकांनी याही वर्षी दिवाळी सण उत्साहाने साजरा केला असून याकाळात फटाके वाजण्याच्या प्रमाणातही वाढ

‘संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख’

नागपूर : सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील अग्रगण्य उत्पादक कंपनी नागपूर येथे विस्तार करीत आहे. या

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींची नाराजी दूर, ७० लाख महिलांच्या अपात्रतेची भीती टळली; e-KYCच्या ‘त्या’ निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती

मुंबई : राज्यातील महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) पुन्हा एकदा

लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’ला ब्रेक; ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता

मुख्यमंत्री शनिवारी जाणार नाशिक दौऱ्यावर

नाशिक : अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे ३८ वे अधिवेशन शनिवार, दि. २५ ते रविवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आयोजित

ठाणे स्टेशनजवळ पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; 'टकल्या' ऊर्फ नितेश शिंदे नावाच्या सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल, शोध मोहीम सुरू

ठाणे: कर्तव्य बजावत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला आज पहाटेच्या सुमारास ठाणे स्टेशनजवळील परिसरात एका सराईत