वारीनंतर भक्ती-शक्ती चौकात ‘स्वच्छता वारी’: ‘earth’ आणि ‘पिंची’ संस्थांचा अभिनव उपक्रम

पिंपरी: संत तुकाराम महाराजांची पालखी १८ जून रोजी देहूतून प्रस्थान करून १९ जून रोजी पिंपरीतील भक्ती-शक्ती चौकात पोहोचली. लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने या पवित्र वारीत सहभागी झाले, मात्र या भक्तिमय सोहळ्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येकडे आता संयुक्त राष्ट्रसंघ मान्यताप्राप्त ‘earth’ आणि ‘पिंची’ या दोन संस्थांनी लक्ष वेधले आहे. या दोन्ही संस्थांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसोबत (PCMC) मिळून भक्ती-शक्ती चौकात स्वच्छता मोहीम राबवण्याचा अभिनव संकल्प केला आहे.


वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक संस्था, नागरिक आणि हॉटेल्स अन्न-पाण्याची व्यवस्था करतात. परंतु, वारी संपल्यानंतर मागे राहणारा कचऱ्याचा डोंगर हा शहराच्या सौंदर्यावर आणि पर्यावरणावर नकारात्मक परिणाम करतो. “स्वच्छता हा खरा धर्म आहे, गलिच्छपणा हा पाप आहे,” असे सांगणाऱ्या संत गाडगे महाराजांचे तत्त्व वारीनंतरही जपले जावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.


या स्वच्छता मोहिमेत ‘earth’ आणि ‘पिंची’ या दोन्ही संस्थांच्या १५० महिला स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. वारीनंतर झालेल्या कचऱ्याच्या साफसफाईची जबाबदारी त्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसोबत (PCMC) उचलणार आहेत.


या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या ‘earth’ एनजीओच्या सीईओ प्रविणा कलमे आणि ‘पिंची’ च्या संस्थापक पूनम परदेशी यांनी सांगितले, “वारीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन केवळ प्रशासनासाठी खूप कठीण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ या स्तुत्य उपक्रमाला सहकार्य करण्याच्या हेतूने आम्ही ‘earth’ आणि ‘पिंची’ संस्थांनी मिळून हा पुढाकार घेतला आहे. ही केवळ स्वच्छतेची जबाबदारी नाही, तर ही आमच्या विठोबाप्रती असलेली भक्तीची आणि सामाजिक जाणिवेची अभिव्यक्ती आहे. भक्तीसोबत आपण आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाची जबाबदारीही घेतली पाहिजे, असा एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही या उपक्रमातून दिला जात आहे.”

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी