आदिवासी विद्यार्थ्यांना २४ कोटींची शिष्यवृत्ती

४२ हजार विद्यार्थ्यांना मिळाला लाभ


पालघर: पालघर जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या ४२ हजार ४३६ आदिवासी विद्यार्थ्यांना सुवर्णमहोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृती योजनेअंतर्गत २४ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना या योजनेमुळे चांगला आधार मिळत असून, २०२५-२६ च्या शैक्षणिक सत्रासाठी वाढीव निधीची मागणी करण्यात येणार आहे.


अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळांमध्ये चांगली उपस्थिती राहावी यासाठी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका व महानगरपालिकांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता सुवर्णमहोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. दहा वर्षे वयापर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आई-वडिलांसोबत संयुक्त बँक खाते शून्य बॅलन्सवर उघडण्यात येत असून दहा वर्षांवरील विद्यार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते या योजनेच्या लाभासाठी उघडण्यात येते. या शिष्यवृत्तीच लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याची शाळेत दर महिन्यात ८० टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे.


पालघर जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने या जिल्ह्यातील हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळतो. १ ली ते ४ थी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ हजार रुपये, इयत्ता पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १५०० रुपये आणि आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना २ हजार रुपये याप्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यात येते. सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यातील ४२ हजार ४३६ विद्यार्थ्यांना २४ कोटी रुपयाच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे.


इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिकत असलेल्या डहाणू तालुक्यातील ८ हजार ६५७ आदिवासी विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे, तर जव्हार तालुक्यातील ३ हजार १२० मोखाडा तालुक्यातील २ हजार २२०, पालघर तालुक्यातील ६ हजार ११६ तलासरीमधील ८ हजार ३१३, वसई तालुक्यातील ३ हजार ५५, विक्रमगड तालुक्यातील ४ हजार ८९५ आणि वाडा तालुक्यातील ६ हजार ६० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील