Maharashtra Rain Updates: कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा इशारा, तर पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात मान्सूनचा कहर, विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित भागात मुसळधार


मुंबई : कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) मार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.


राज्यात मागील २४ तासांमध्ये (२० जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ४१.७ मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ४१.६ मिमी, पालघर ४१.६ मिमी, रायगड जिल्ह्यात ४०.१ मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ३१.७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.


राज्यात कालपासून आज २० जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारीनुसार ठाणे ४१.६, रायगड ४०.१, रत्नागिरी ४१.७, सिंधुदुर्ग २४.२, पालघर ४१.६, नाशिक २७.४, धुळे १.५, नंदुरबार ४, जळगाव ३.४, अहिल्यानगर ८.४, पुणे २८, सोलापूर २, सातारा २६.५, सांगली ५.४, कोल्हापूर १७.४, छत्रपती संभाजीनगर ७.२, जालना ५.५, बीड ४.८, लातूर ०.६, धाराशिव ३.३, नांदेड ३.७, परभणी ३, हिंगोली ७.८, बुलढाणा ६.५, अकोला ११.६, वाशिम ७.६ अमरावती १२, यवतमाळ ९.७, वर्धा १०.७, नागपूर ५.९, भंडारा ३.२, गोंदिया ३.९, चंद्रपूर २.६ आणि गडचिरोली जिल्ह्यात १.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.


नाशिक जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तर जालना जिल्ह्यात वीज पडून एका प्राण्याचा मृत्यू झाला आहे.



जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर, अनेक धरणाचे दरवाजे उघडले


राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण मुठा नदी १५,०९२ क्यूसेक, बंडगार्डन बंधारा पुणे-२४,४१६ क्युसेक, भिमा नदी दौंड पूल विसर्ग १०,८३३ क्युसेक, घोड नदी घोड धरण ४,००० क्युसेक, कण्हेर धरण सातारा ५०० क्युसेक, वेण्णा नदी-१,००० क्युसेक विसर्ग सुरू असून नदी किनाऱ्या लागत गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदी नांदूर मधमेश्वर धरणातून २२,३४५ क्युसेक, सीना नदी धरणातून २८९ क्युसेक विसर्ग सुरू आहे.



रत्नागिरीत वाहतूक ठप्प


रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड, दापोली नगरपालिका हद्दीमध्ये पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. बोरघर वावे तर्फे नातू चिंचवली या रस्त्यावरच्या पुलावर पाणी गेल्याने रस्ता बंद होता. वनोशी अंगणवाडी पन्हाळे फणसूर रस्त्याच्या मधील पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थित वाहतूक सुरळीत चालू आहे. चिंचगर कोरेगाव भैरवी रोड मधील रस्त्यावर पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थित वाहतूक सुरळीत चालू आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ (गुहागर- चिपळूण-विजापूर) सोनपात्र वळणाजवळ दरड कोसळयाने काही काळ वाहतूक बंद करून दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे चिपळूण, दापोली येथे झाड कोसळून आणि भिंत पडून खासगी मालमत्तांचे नुकसान झाली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या