भारताची भूमिगत एलपीजी साठा यंत्रणा सज्ज

नवी दिल्ली : भारताने मंगळुरू येथे एलपीजीचा साठा युद्धकाळातही सुरक्षित ठेवण्यासाठी एक भूमिगत यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेमुळे देशाचा ८० हजार मेट्रिक टन एलपीजी साठा जमिनीखाली सुरक्षित राहू शकेल. जगात अस्तित्वात असलेल्या अनेक घातक बॉम्बपासून हा साठा सुरक्षित राहणार आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडने (एमईआयएल) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (एचपीसीएल) ही यंत्रणा विकसित केली आहे. भारताच्या पेट्रोलियम साठ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सुरू असलेल्या उपायांपैकी हा एक धोरणात्मक उपाय आहे.

भारतातील ही दुसरी एलपीजीची भूमिगत साठवणूक यंत्रणा आहे. याआधी विशाखापट्टणम येथे ६० हजार मेट्रिक टन द्रवरुप इंधन साठा जमिनीखाली सुरक्षित राहू शकेल अशी यंत्रणा विससित करण्यात आली आहे. विशाखापट्टणम आणि मंगळुरू या दोन ठिकाणी विकसित केलेल्या भूमिगत साठवणूक यंत्रणेमुळे भारत १४० हजार मेट्रिक टन द्रवरुप इंधन साठा जमिनीखाली सुरक्षित ठेवू शकेल.

विशाखापट्टणम येथे दोन स्वतंत्र साठवणूक क्षमता मिळून ६० हजार मेट्रिक टन द्रवरुप इंधन साठा जमिनीखाली सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. सरकार आवश्यकतेनुसार विशाखापट्टणम येथे एलपीजी ऐवजी ४० हजार मेट्रिक टन प्रोपेन आणि ६० हजार मेट्रिक टन ब्युटेन जमिनीखाली साठवून ठेवू शकते.

मंगळुरू येथे समुद्रसपाटीपासून सरासरी १४१ मीटर खाली असलेल्या ग्रॅनाइटिक गनीस खडकात खोलवर कोरुन साठवणूक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे भूजलाचा दाब एलपीजीला खडकांच्या चेंबरमध्ये सुरक्षितपणे सीलबंद ठेवण्यास मदत करेल. शाफ्ट १६४.५ मीटर पर्यंत पसरतो, ज्यामुळे गॅस साठवण्यासाठी तसेच गॅसची वाहतूक करण्यासाठी एक सुरक्षित यंत्रणा उपलब्ध होते. हे बांधकाम ड्रिल-अँड-ब्लास्ट पद्धतीने केले गेले. यासाठी उच्च-स्तरिय भूगर्भीय मूल्यांकन आणि अचूक अभियांत्रिकी कौशल्य यांचा वापर झाला आहे. जमिनीखाली असलेला कचरा काढून टाकण्यासाठी आणि साठवणूक यंत्रणेपर्यंत प्रवेश सुकर व्हावा याकरिता १.१ किलोमीटरचा प्रवेश बोगदा तयार करण्यात आला आहे. मंगळुरू येथील प्रकल्पासाठी आठशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.

Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या