महाराष्ट्रात XFG कोविड प्रकार आघाडीवर; NB.1.8.1 प्रकारही पुण्यात सापडला

मुंबईत १९ नवीन कोविड रुग्ण; ३१ मृत्यूंपैकी ६ मुंबईत


पुणे : महाराष्ट्रातील कोविडच्या नव्या लाटेमागे कोणता प्रकार कारणीभूत आहे, यावर प्रकाश टाकणाऱ्या जीनोम सिक्वेन्सिंग अहवालानुसार XFG हा ओमिक्रॉनचा उपप्रकार सध्या राज्यात सर्वाधिक आढळतोय.
BJ मेडिकल कॉलेज व NIV पुणे यांच्या संयुक्त संशोधनात १० जिल्ह्यांतील १८४ नमुन्यांमध्ये XFG चे ८४ रुग्ण आढळले.



इतर प्रकारांची आकडेवारी :



  • LF.7.9 : ३४ रुग्ण

  • JN.1 : २७ रुग्ण

  • NB.1.8.1 : १ रुग्ण (२९ वर्षीय महिला, पुणे)


NB.1.8.1 या प्रकारात ACE2 रिसेप्टरशी अधिक सशक्त बांधणारी क्षमता आणि रोगप्रतिकार यंत्रणेला चुकवण्याची क्षमता आहे. तरीसुद्धा सध्याची वाढ XFG प्रकारामुळे झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.



डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्या मते, NB.1.8.1 हा प्रकार जास्त करून दक्षिण-आशियाई देशांमध्ये आढळतो, तर XFG भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अलीकडे अमेरिका येथेही दिसू लागला आहे.


डॉ. अमीत द्रविड (नोबेल हॉस्पिटल) यांच्या मते, XFG प्रकारामुळे फुफ्फुसांवर परिणाम फारसा होत नाही, आणि बहुतेक रुग्णांना OPD उपचार पुरेसे ठरत आहेत.


डॉ. पियुष चौधरी (जहांगीर हॉस्पिटल) यांनी इशारा दिला की, सौम्य वाटणारे प्रकारही मोठ्या संख्येने रुग्ण वाढले तर गंभीर परिणाम घडवू शकतात, विशेषतः वृद्ध व कोमॉर्बिड व्यक्तींमध्ये.



राज्यात पुन्हा सौम्य लाट, ३१ मृत्यूंपैकी ६ मुंबईत


मे महिन्यापासून राज्यात कोविड रुग्णांच्या संख्येत सौम्य वाढ दिसून येत आहे. बुधवारी महाराष्ट्रात एकूण ६१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, यातील १९ रुग्ण केवळ मुंबईतील आहेत. त्यामुळे मे महिन्यापासून शहरातील एकूण कोविड रुग्णसंख्या ८९९ वर पोहोचली आहे.


उर्वरित रुग्णांचे जिल्हावार आकडे : पुणे (१२), नागपूर (८), पिंपरी-चिंचवड (५), सांगली (४), ठाणे (३), नवी मुंबई (२), पनवेल (२), वर्धा (२), छत्रपती संभाजीनगर (२), मिरा-भाईंदर (१) आणि सातारा (१).


आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सर्व नवीन रुग्ण सौम्य लक्षणांसह असून, अनेकांना घरगुती उपचार पुरेसे ठरत आहेत. मात्र, मेपासून आतापर्यंत राज्यात ३१ मृत्यू झाले असून, यातील ६ मृत्यू मुंबईत झाले. एक ४४ वर्षीय यकृत सिरोसिस असलेल्या रुग्णाचा मृत्यू रविवारी झाला. सर्व मृत रुग्णांना गंभीर आजार (कोमॉर्बिडिटी) होती.


राज्य आरोग्य विभागाने सर्व महापालिकांना ILI (Influenza-like Illness) आणि SARI (Severe Acute Respiratory Infection) रुग्णांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यात ५% ILI आणि १००% SARI रुग्णांची कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Deputy Chief Minister Eknath Shinde : एकनाथ शिंदे शिवसेनेत ‘भाकरी’ फिरवणार?

अकार्यक्षम नेत्यांना दाखवणार घरचा रस्ता; मंत्र्यांपासून शाखाप्रमुखांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार होणार मुंबई :

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

मित्रानं वाढदिवसाला न बोलावल्यानं २४ वर्षीय तरुणानं जीवन संपवलं अन्...

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबफेळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणानं

Chief Minister Devendra Fadnavis : व्हिएतनामची महाराष्ट्रात ८.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; उद्योग विभाग आणि ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार मुंबई :

तब्बल १३ महिन्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर साताऱ्याच्या नीलमचा अमेरिकेत अखेरचा श्वास!

सातारा : नियतीचा क्रूर खेळ आणि साताऱ्याच्या लेकीने दिलेला लढा, अखेर दुर्दैवाने संपला आहे. कराड तालुक्यातील

New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य