‘म्हाडा’च्या जनता दरबारात १० तक्रारींचे निवारण

  50

मुंबई : जनसामान्यांच्या समस्यांकडे तत्काळ लक्ष देत त्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने ‘म्हाडा’च्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी झालेल्या तिसऱ्या जनता दरबार दिनात एकूण १० तक्रार अर्जांवर सुनावणी घेण्यात येऊन सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले. वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयातील कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी यांच्या दालनात झालेल्या या लोकाभिमुख उपक्रमात, गायकर यांनी अर्जदारांच्या समस्यांचे त्वरित निवारण करत अर्जदारांच्या मागण्या व प्रलंबित कामे तत्परतेने सोडविण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिले.


नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनिक विभागांकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार ‘नागरिकांच्या तक्रारींचे निवारण’ या महत्त्वपूर्ण घटकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनता दिन आयोजित करावा, असे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले.


या निर्देशांची तात्काळ अंमलबजावणी करत कोकण मंडळाने तिसरा जनता जनता दरबार दिन घेत शासनाच्या जनकल्याणकारी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचा प्रत्यय दिला.


लोकशाही व्यवस्थेतील पारदर्शकता आणि जनतेशी थेट संवाद यांना अधोरेखित करणारी ही अभिनव संकल्पना पुढे नेण्याचा निर्धार कोकण मंडळाने केला आहे. काल झालेल्या जनता दरबार दिनात, देखभाल शुल्क समायोजित करणे, विक्री किंमत भरण्यास उशीर झाल्यामुळे आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम परत करण्यात यावी, सोसायटी लवकर स्थापन करण्यास परवानगी देण्याबाबत सहकार उपनिबंधकांनी कार्यवाही करावी, म्हाडा वसाहतीतील समस्या सोडविणे आदींबाबत अर्ज प्राप्त झाले. गायकर यांनी सर्व अर्जदारांचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ व योग्य कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही