Mumbai rain मुंबई शहर जिल्ह्यात १४२ मिमी पाऊस, मुंबई - पुण्यासाठी २४ तास धोक्याचे....

मुंबई : भारतीय हवामान विभागाने नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात आज गुरुवारी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करुन रेट अलर्ट जारी केला आहे. मुंबई, रायगड, नाशिक, सातारा, जिल्ह्यातील घाट क्षेत्रातील मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.  कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्राला पुढील चार दिवस यलो अलर्ट दिला आहे.  रत्नागिरी, पालघर, ठाणे, आणि सिंधुदुर्गात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे.

https://x.com/RMC_Mumbai/status/1935601037219619317

विशेष म्हणजे  पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रात पुढील चार दिवस पावसाचा जोर अधिक राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्राला पुढील चार दिवस जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे. राज्यातील उर्वरित भागात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पाऊस राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  तसेच मुंबई - पुणे जिल्ह्यात पुढील २४ तासात पावसाचा जोर वाढण्याची हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे.

  गेल्या २४ तासात  मुंबई शहर जिल्ह्यात १४२ मिमी पाऊस 

राज्यात मागील २४ तासांमध्ये (१९ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई शहर जिल्ह्यात १४२.६ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात १३४.१ मिमी, पालघर १२०.९ मिमी, ठाणे ९०.३ मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ६०.५ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 
Comments
Add Comment

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल