हिंदी भाषा सक्तीला बळी पडू नका, डोंबिवलीतील शाळांना मनसेचे पत्र

डोंबिवली : देशातील इतर राज्यात शाळांमध्ये हिंदी भाषा शक्ती नसताना महाराष्ट्रातच शाळांमध्ये हिंदी भाषा सक्ती का? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हिंदी भाषासक्ती नको असे पत्र मनसैनिक मुख्याध्यापकांना देतील असे सांगितले होते.


गुरुवारी डोंबिवलीतील शाळांमध्ये मनसे पदाधिकारी व मनसैनिकांनी मुख्याध्यपकांना निवेदन दिले. हिंदी भाषेला बळी पडू नका, सरकारकडून जर आपल्यावर दबाव येत असेल तर मनसेच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन केले.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या आदेशानुसार आणि मनसे नेते तथा माजी आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या सूचनेनुसार शाळांना निवेदन देताना यावेळी कल्याण जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहरप्रमुख राहुल कामत,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शहराध्यक्ष मिलिंद म्हात्रे, विधानसभा सचिव उदयजी वेळासकर, कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, महिला शहर सचिव कोमल पाटील शहर संघटक प्रतिभा पाटील ,स्मिता भणगे, सुमेधा थत्ते, शहर सचिव संदीप (रमा) म्हात्रे उपशहर अध्यक्ष श्रीकांत वारंगे,प्रेम पाटील, प्रतीक देशपांडे, परेश भोईर, विभाग अध्यक्ष कदम भोईर,रवी गरुड, प्रदीप चौधरी,संजय चव्हाण तसेच उपविभाग अध्यक्ष,शाखा अध्यक्ष, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी