Wari 2025 : हातात पताका, गळ्यात टाळ आणि मुखी विठुरायाचे नाम!

  50

माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सज्ज



अवंदा गर्दी हाय म्हणत्यात... पाऊस बक्कळ हाय बघा, पण पेरण्या रखडल्यात. असो, माउली बघून घेतील ओ..! चला माउलींच्या वारीला..!! असं म्हणत महाराष्ट्राच्या गावांगावातून वारकऱ्यांच्या दिंड्यांनी आळंदी गाठलीय. वारकऱ्यांच्या गर्दीने अवघी अलंकापुरी फुलून गेलीय. हातात पताका, गळ्यात टाळ आणि मुखी पाडुंरंगाचे नाम...असं चैतन्याची अनुभूती देणार वातावरण सध्या इथं अनुभवायला मिळतयं.


?si=94LpjkBb3Hd696xa

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळा उद्या म्हणजे गुरुवारी रात्री ८.०० वाजता होत आहे. त्यामुळं या सोहळ्याच्या तयारीची लगबग आज आळंदीत पाहायला मिळतेय. प्रस्थान सोहळ्याचा कार्यक्रम कसा असेल ते पाहूया...



गुरूवारी पहाटे ४ ते ५.३० वाजता
घंटानाद, काकडा, पवमानाभिषेक, पंचामृतपूजा व दुधारती.


पहाटे ५ ते सकाळी ९ वाजता
भाविकांची माउलींच्या चलपादुकांवर महापूजा होईल


सकाळी ६ ते दुपारी १२ वाजता
भाविकांना समाधिस्पर्श दर्शन


सकाळी ९ ते ११ वाजता
वीणामंडपात कीर्तन होईल.


दुपारी १२ ते १२.३०
गाभारा स्वच्छता व माउलींना महानैवेद्य.


दुपारी १२ ते ५
भाविकांना समाधिस्पर्श दर्शन.गुरुवारची श्रींची नित्य पालखी प्रदक्षिणा


रात्री ८ वाजता
प्रस्थान सोहळा कार्यक्रम सुरू होईल. यात श्रीगुरू हैबतबाबा आरती, संस्थानतर्फे आरती, मानकऱ्यांना नारळप्रसाद, माउलींच्या पादुका पालखीत ठेवण्यात येतील. संस्थानतर्फे मानकऱ्यांना मानाच्या पागोट्यांचे वाटप, श्रीगुरू हैबतबाबातर्फे नारळप्रसाद, संस्थानतर्फे समाधीजवळ नारळप्रसादाचे वाटप होऊन पालखी वीणामंडपातून प्रस्थान ठेवत महाद्वारातून बाहेर पडते. प्रदक्षिणा घातल्यानंतर गांधीवाडा मंडप या ठिकाणी पालखीचा मुक्काम असणार आहे.

Comments
Add Comment

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या

दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाकडून लैंगिक अत्याचार

जळगाव : दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घडली. जळगावच्या पाचोरा

निफाडमध्ये चक्क कुत्र्यानेच बिबट्याला नेले फरपटत

निफाड : संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत असल्याचे नागरिकांना पशुधन सांभाळण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे.

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना