झरीखाडी पुलाच्या दुरुस्तीमुळे वाहतूक बंद

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन


डहाणू  : पालघर जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या तलासरी उंबरगाव मार्गावरील झरीखाडी पुलाचे काम प्रगतिपथावर असून पुलाचे काम सुरू असल्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पूल बंद असल्यामुळे नागरिकांना पर्यायी रस्त्याचे वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र यामुळे नागरिकांना १० ते १२ किलोमीटर लांबच्या पर्यायी रस्त्याचे वापर करावा लागत असून नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.


तलासरी उंबरगाव रस्त्यावरील झरी खाडी पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी हा पूल पाण्याखाली जात असून यामुळे वाहतूक विस्कळीत होत होती. अनेक वर्षांपासून या पुलाची उंची वाढवण्याची मागणी करण्यात येत असून अखेर या ठिकाणी नवीन पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू असून पर्यायी मार्ग म्हणून जुन्या पुलावर मातीचा भराव टाकून वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असून अनुचित प्रकार रोखण्यासाठी या पुलावरून वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सेंबर २०२४ मध्ये नवीन पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून या पुलासाठी २२ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.


पावसाळ्याच्या पूर्वी या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदाराला निधी उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे पुलाचे काम लांबल्याची माहिती देण्यात येत आहे. पावसाळ्यात पुलावरून वाहतूक बंद असल्यामुळे नागरिकांनी पर्यायी कवाडा, वसा, वेवजी, उंबरगाव या लांबच्या रस्त्याचा अवलंब करावा लागत आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास आणि खर्चाला सामोरे जावे लागत आहे. तलासरी तालुक्यातून संजान, उंबरगाव, वेवजी बाजूला कंपनी मधील कामगार, विद्यार्थी आणि रुग्ण प्रवास करतात.
सध्या झरीखाडी पूल वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे कामगार, विद्यार्थी आणि रुग्णांना पर्यायी लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. तसेच तलासरी बाजूने मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहने उंबरगाव येथील औद्योगिक वसाहतीत जात असून नवीन चालकांची दिशाभूल होऊन त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Comments
Add Comment

नगराध्यक्ष हरले, मात्र जिल्हाध्यक्ष जिंकले

जिल्ह्यात भाजपचे ९४ पैकी ५० नगरसेवक गणेश पाटील पालघर: पालघर जिल्ह्यात तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या

भाजप नेत्यांचे ‘रायगड’वर विचारमंथन

टिळक भवनात आज काँग्रेसची खलबते वसई : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

मच्छीमारांच्या सर्वांगीण सर्वेक्षणाला गती

वाढवण बंदर प्रकल्प: जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार पालघर : प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या

कुडूसला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा

५२ गावांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाची मंजुरी वाडा : वाडा तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि ५२

पालघरच्या मजुरांचा ‘मस्टर रोल’ राज्यभर पोहोचणार

ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडून उपक्रमाचे कौतुक पालघर : पालघर जिल्ह्यातील मनरेगा योजनेअंतर्गत

एकाच महिला नेत्याला मिळाला प्रथम नागरिकाचा मान!

वसई-विरारमध्ये पाच पुरुष महापौर गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी विराजमान होण्याची संधी