विजेअभावी पालघरमधील रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ

  53

पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील कासा गावात गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा फटका रिक्षा चालकांवर बसत असल्याचे दिसून येत आहे. सीएनजी पंपावर वीज पुरवठा खंडित असल्याने रिक्षा चालकांना आठ तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यानंतरही सीएनजी मिळत नसल्याने रिक्षा चालकांचा धंदा होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.


या काही दिवसांपासून रिक्षाचालक सकाळी सीएनजी भरण्यासाठी पंपावर जातात. पण तेथे वीज पुरवठा खंडित असल्याने सीएनजी मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे रिक्षाचालक दिवसभर रिक्षा चालू शकत नाहीत. त्यामुळे अनेकांना उपासमारीचे संकट पडले आहे. रिक्षा चालकांनी रिक्षा कर्ज काढून घेतल्या असल्यामुळे हप्ता कसा भरायचा या विवंचनेत आहेत. सध्या शाळा व कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेकडे पोहोचवणे व घरी पोहोचवणे यासाठी रिक्षा लावल्या आहेत.


विजेचा खोळंबा होत असल्याने सीएनजी वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक विवंचना सुरू झाली आहे. कासा चारोटी परिसरात वीजपुरवठा खंडित होत असल्याने रोज प्रवासी रिक्षा धंद्यावर उदरनिर्वाह करणारे ४०० ते ५०० रिक्षा चालकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments
Add Comment

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या

दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाकडून लैंगिक अत्याचार

जळगाव : दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घडली. जळगावच्या पाचोरा

निफाडमध्ये चक्क कुत्र्यानेच बिबट्याला नेले फरपटत

निफाड : संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत असल्याचे नागरिकांना पशुधन सांभाळण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे.

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना