Wari 2025 : चला वारीला...पांडुरंगाच्या भेटीला!

तुकोबा पालखी सोहळ्याला प्रारंभ


लाडक्या विठूरायाला भेटण्यासाठी लाखो वारकरी आज दुपारी अडीजच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थानं ठेवतील. जगदगुरू संत तुकाराम यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या देहूनगरीतून पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणा करून मार्गस्थ होणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वैष्णव व दिंड्या इथं दाखल झालेल्या आहेत. काय आहे माहिती जाणून घेऊया या लेखातून...


?si=EhBB2DRIoYwII1ql

महाराष्ट्राला आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा लाभली आहे. पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरु आहे. लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर, ग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात विठुरायाचे नामस्मरण करीत वारकरी नामस्मरणात लीन होत आहेत. यंदा संत तुकाराम महाराज यांच्या ३४० व्या आषाढी सोहळ्याला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. या पालखी सोहळ्यासाठी आलेल्या वारकरी व भाविकांमुळं देहुनगरी गर्दीने फुलून गेली आहे. 'ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम 'चा जयघोष असं वातावरण इथं पाहायला मिळतयं.



ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता काना - कोपर्‍यातून वृद्ध महिला-पुरुष वारकरी, माऊली व विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले दिसत होते. देहुनगरीमध्ये काही ठिकाणी रस्ते व चौक बंद असले तरी मार्ग काढत वारकरी मंदिर परिसरात गर्दी करत होते. अभंग व टाळ- मृदंगाच्या नादातील भजनाने देहुनगरी न्हाऊन निघालीय. इंद्रायणीचा घाट भाविकांनी सजला आहे. सर्व रस्ते, प्रदक्षिणा मार्ग, संत तुकाराम महाराज मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलल्याचे दिसत आहे. देहूतून पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पुढे पंढरपूरपर्यंत महिनाभर पायी वाट तुडवत आणि विसावा घेत जाण्यासाठी लागणारा तुटपुंजा संसार पाठीवर आणि काखेत अडकून वारकरी निघाले आहेत.


प्रवासासाठी छत्री, नाहीतर रेनकोट, कपडे, अंथरूण आणि खाण्याच्या सामानाची पिशवी बास एवढेच काय ते सामान. प्रमुख दिंड्याच्या उपस्थित वारकरी भाविक भक्तांसह हरिनामाच्या गजर करत टाळ-मृदंगाच्या निनादात आज सायंकाळी पाच वाजता मुख्य मंदिरातून प्रस्थान होईल. सायंकाळी साडे सहा वाजता पालखी प्रस्थान सोहळा श्री तुकोबारायांच्या आजोळी म्हणजे इनामदारसाहेब वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसवणार आहे. त्या ठिकाणी आरती होऊन रात्री देहूकर महाराजांचे कीर्तन, हरिनामाचा जागर असे धार्मिक कार्यक्रम होतील.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या