एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी होणार बदल, रस्त्यावर धावणार खासगी बसेस...

  100

मुंबई : राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे एसटी महामंडळाला फायदा होऊ शकतो. जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावर खासगी बसेस चालवण्याचे नियोजन राज्य सरकार तर्फे करण्यात आले आहे. खासगी बससेच्या व्होल्वो कंपनीला एसटीचा लोगो, तिकिट सेवा आणि एसटी थांबे प्रदान करण्यात येणार आहेत, त्यामुळे खाजगी बस कंपनीला फायदा होणार असून, त्यातील 14 टक्के हिस्सा राज्य सरकारला देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात 30 शयनयान, आणि 70 आसनी, अशा 100 व्होल्वो बस दाखल होणार आहेत.

एसटीची आर्थिक स्थिती सुधरण्यासाठी प्रतिदिन 34 कोटी अपेक्षित असून सद्यस्थिती एसटी महामंडळाला 30 कोटी उत्पन्न मिळत आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ असूनही एसटीला  जास्त प्रमाणात नफा झाला नाही. भाडेवाढ होऊनही एसटीची तिजोरी रिक्त आहे. प्रवाशांनी देखील एसटीकडे पाठ फिरवली असल्याने एसटी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. एसटी ज्या मार्गांवरुन धावणार आहे त्या मार्गांवरती प्रवाशांसाठी सुख सोयी उभारण्याकरता व्होल्वो खासगी कंपनी तर्फे नियोजन करण्यात येणार आहे. या बसचा खासगी चालक आणि वाहक दोन्हींचा खर्च खासगी कंपनीचा असून एसटी प्रवासी मोठ्या प्रमाणात खासगी बसने प्रवास करतील, या बदल्यात खासगी बसकडून मोठ्या प्रमाणात एसटी महामंडळाला महसूल मिळेल. त्यामुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीत किती टक्के वाढ होईल ते पाहणंं महत्वाचं असणार आहे.
Comments
Add Comment

Teacher Protest: शिक्षकांच्या मागण्या सरकारकडून मान्य! २० टक्के वाढीव पगार लवकरच खात्यात जमा होणार

"अधिवेशन संपताच शिक्षकांच्या खात्यावर पैसे": गिरीश महाजन मुंबई: आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला यश

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक