Warkari Accident: देहू-आळंदी रस्त्यावर भरधाव क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

देहू: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची सुरूवात झालेली असतानाच एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. देहूगाव ते आळंदी रस्त्यावर एका वारकऱ्यास भरधाव क्रेनने धडक दिल्याने यात गंभीर जखमी होऊन सदर वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. देहू-आळंदी मार्गावरील तळवडे येथे ही घटना घडली.


नारायण गोदवे (वय ५७, रा. आहेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू पावलेल्या वारकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी क्रेन चालकास ताब्यात घेतले आहे.


प्राथमिक माहितीनुसार, नारायण गोदवे हे देहूहून आळंदीच्या दिशेने पायी निघाले होते. तळवडे येथील शेलार वस्तीजवळ ते आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान वारी सोहळ्याची सुरूवात होत असतानाच हा अपघात झाल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या

बीडमध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

बीड : बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

माजी उपसरपंचाच्या आत्महत्येनंतर नर्तिका पूजा गायकवाडच्या फॉलोअर्समध्ये वाढ!

बीड: बीडच्या गेवराईतील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःवर गोळी झाडून

कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये; मंत्री छगन भुजबळ यांचे ओबीसी बांधवांना आवाहन

ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबियांचे भुजबळांनी केले सांत्वन, म्हणाले... लातूर: मनोज

रेशनच्या तांदळात आढळला मृत साप

सोलापूर : सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मागील दोन