साताऱ्यात ३२ वर्षानंतर मराठी साहित्य समेलंन, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड...

 

सातारा : साताऱ्यात ३२ वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्यामुळे या ९९ व्या मराठी साहित्य संमेलनासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिहराजे भोसले  (Shivendrasingraje Bhosale) यांची स्वागताध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

साताऱ्यात मराठी साहित्य संमेलन (marathi sahitya samelan) व्हावे अशी मागणी मावळा फाउंडेशन या संस्थांनी केली होती. मावळा फाउंडेशन आणि अखिल मराठी साहित्य संमेलन या दोन्ही संस्थाची संयुक्त बैठक नुकतीच झाली पार पाडली. अध्यक्षस्थानी महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी होते. ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकीहोळ यांनी स्वागताध्यक्षपदासाठी शिवेंद्रसिंह राजे यांचे नाव सुचवले.

यापूर्वी साताऱ्यात १९९३ मध्ये ६६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले होते.या संमेलनाचे स्वागताध्यक्ष अभयसिंहराजे भोसले होते. आता त्यांचे पुत्र शिवेंद्रसिंह राजे भोसले आहेत. शताब्दीपूर्व साहित्य संमेलन अतिशय देखण आणि दिमाखदार करुन दाखवू असे शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले...

 
Comments
Add Comment

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’