Sunday, November 2, 2025
Happy Diwali

साताऱ्यात ३२ वर्षानंतर मराठी साहित्य समेलंन, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड...

साताऱ्यात ३२ वर्षानंतर मराठी साहित्य समेलंन, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड...
  सातारा : साताऱ्यात ३२ वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्यामुळे या ९९ व्या मराठी साहित्य संमेलनासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिहराजे भोसले  (Shivendrasingraje Bhosale) यांची स्वागताध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. साताऱ्यात मराठी साहित्य संमेलन (marathi sahitya samelan) व्हावे अशी मागणी मावळा फाउंडेशन या संस्थांनी केली होती. मावळा फाउंडेशन आणि अखिल मराठी साहित्य संमेलन या दोन्ही संस्थाची संयुक्त बैठक नुकतीच झाली पार पाडली. अध्यक्षस्थानी महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी होते. ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकीहोळ यांनी स्वागताध्यक्षपदासाठी शिवेंद्रसिंह राजे यांचे नाव सुचवले. यापूर्वी साताऱ्यात १९९३ मध्ये ६६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले होते.या संमेलनाचे स्वागताध्यक्ष अभयसिंहराजे भोसले होते. आता त्यांचे पुत्र शिवेंद्रसिंह राजे भोसले आहेत. शताब्दीपूर्व साहित्य संमेलन अतिशय देखण आणि दिमाखदार करुन दाखवू असे शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले...  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >