चिमुकल्या प्रीत ने वाचवले दयाळ पक्ष्याच्या पिल्लांचे प्राण.

  48

दोऱ्यामध्ये अडकलेल्या दोन पिल्लांची केली मुक्तता


माणगाव : माणगांव येथील विकास कॉलनी परिसरात राहत असलेल्या गणेश सुतार यांना त्यांच्या घरासमोर दारात शुक्रवार दि.१३ जूनला सकाळी पक्ष्याची दोन लहान पिल्ले आढळून आली, त्यांची लहान मुलगी प्रीत हिचे ह्या पक्ष्याच्या पिल्लांकडे लक्ष गेले, हि पिल्ले उडण्यास असमर्थ होती, दोन्ही पिल्ले एकमेकांना चिटकून असल्याचे लक्षात आले, गणेश सुतार यांनी त्वरीत माणगांवचे वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर ह्यांना संपर्क साधला.



सध्याच्या पावसाच्या सुरुवातीच्या दिवसात अनेक पक्ष्यांचा विणीचा हंगाम संपून पिल्ले घरट्यातून बाहेर उडून जातात, त्यामुळे घरट्यातून पहिल्यांदाच उडालेली ''दयाळ'' म्हणजेच ''ओरिएंटल मॅगपाय रॉबिन'' ह्या पक्ष्याची हि पिल्ले खाली पडली असावी असा अंदाज लावत शंतनू कुवेसकर यांनी पिल्लाना एखाद्या झाडावर सोडून द्यावे असे प्रीत च्या वडिलांना सांगितले परंतु पक्ष्याची लहान पिल्ले हाताळण्याची हिम्मत होत नसल्या कारणाने व पिल्ले एकमेकांना अडकून पडल्याने गणेश सुतार यांनी शंतनु कुवेसकर यांना येथे येणाच्या आग्रह केला.


चिमुकलया प्रीतने कुवेसकर पोहोचेपर्यंत पिल्लाना एका सुरक्षित जागी टोपल्याखाली झाकून ठेवले होते, कुवेसकर यांनी पाहणी केली असता लक्षात आले कि पक्षी आपले घरटे बांधण्यासाठी अनेक प्रकारच्या वस्तू गोळा करून नेहतात, मानव वस्तीजवळ कापूस-धागे-दोरे घरट्यासाठी घेऊन जाताना दिसून येतात, घरट्यासाठी नेहेलेल्या एका दोऱ्यामध्येच पिल्लांची वाढ होत असतानाच दोन पिल्लांच्या पायाला दोरा गुंडाळला गेला असावा आणि पिल्लांची तशीच वाढ झाली पण जेव्हा पिल्लांची घरट्यातून उडण्याची वेळ आली त्यावेळेला त्यांचे पाय गुंतलेले असल्याकारणाने ते उडण्यास असमर्थ होते असे लक्षात आले.


शंतनु कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिमुकल्या प्रीतीनेच सुरक्षितरित्या पिल्लांच्या पायातील दोरा कापून व सोडवून पिल्लांना मुक्त केले आणि आपल्या घराजवळीलच चिकूच्या झाडावर सोडले, सोडता क्षणीच त्या पिल्लांचे पालक पक्षी लगेच पिल्लांकडे येऊन त्यांना भरवू लागले, थोड्याच वेळात पिल्लांसोबत छोटी छोटी उड्डाणे घेऊन पालक पक्षी पिल्लांना सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले.

Comments
Add Comment

गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या 2500 फेऱ्या

कोकणात गणेशोत्सवासाठी येणार असलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी अडीच हजार एसटी गाड्यांचे नियोजन

कोकणात पुढील 4 दिवस विजांसह मुसळधार पावसाचा इशारा

राज्यभरात सध्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून कोकणात पुढील ४ दिवस विजांसह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताय तर वाहतुकीचे हे बदल पाहा

गणपती म्हटलं की कोकणकर गावाला जाणार नाही असं होत नाही. मात्र दरवर्षीप्रमाणे त्रासदायक असणारा मार्ग म्हणजे

कोकणात मुसळधार पावसाने झोडपले, पाऊस आणि वाऱ्यामुळे मासेमारी ठप्प

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मुसळधार

मिनी ट्रेन सेवेत वाढ करण्यात रेल्वे प्रशासन ढिम्म!

नेरळ-माथेरान फेऱ्या वाढवण्याची मागणी माथेरान : देशविदेशातील पर्यटक नेहमीच माथेरानच्या मिनी ट्रेनची सफर मिळावी

सततच्या पावसामुळे पपनसावर किडीचा प्रादुर्भाव

गळ कीड रोगावर संशोधनाची मागणी नांदगाव मुरुड : सतत बरसत राहणाऱ्या पावसामुळे कोकणातील पपनस पिकाचे मोठे नुकसान