पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग वाहनांनी तुडूंब झाल्याने अजून अतिरीक्त वाहनांचा बोजा मुंबईवर पडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी अवजड वाहनांचे प्रवेश बंदी केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी स्वत: पुढाकार घेऊन मुंबईच्या दिशेकडे जाणा-या अवजड वाहनांना ( १० चाकी) नवी मुंबईतच प्रवेश बंदीचे आदेश दाखवून थांबवले जात आहे.

नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्तांनी यासंदर्भात शुक्रवारी स्वतंत्र अधिसूचना जाहीर करून तातडीने त्याची अंमलबजावणी सुरू केली. यामुळे ठाणे आणि पनवेलच्या अनेक ठिकाणाहून मुंबईत प्रवेश करणा-या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांना रोखण्यात येत आहे. पनवेल शीव महामार्गावर खारघर टोलनाक्याच्या उड्डाणपुलाखाली कळंबोली पोलिसांनी बंदोबस्त लावून ही वाहने थांबविण्यात आली आहे. तसेच रबाळे, ऐेरोली, वाशी, मुंबईच्या दिशेने जाणा-या अवजड वाहनांना बंदीचे आदेश दाखवून थांबवून रस्त्याकडेला उभे केले जात आहे. माल घेऊन मुंबईत जाणा-या अवजड वाहनचालकांना आंदोलनामुळे ऐेनपावसाळ्यात जावे कुठे असा प्रश्न पडला आहे. आंदोलनामुळे अवजड वाहने रस्त्यावर उभे केल्यास नवी मुंबईतील मुख्य महामार्गांवर सुद्धा वाहतूक कोंडी होऊ शकते अशी भिती असल्याने जोपर्यंत मुंबईची वाहतूक कोंडी फुटत नाही तोपर्यंत नवीन आदेश येईपर्यंत तातडीने वाहतूकादांशी वाहनचालकांशी संपर्क करून सूरक्षित ठिकाणी त्यांचे वाहन उभे कऱण्याची विनंती पोलिसांकडून अवजड वाहनचालकांना केली जात आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरूपती काकडे यांनी काढलेल्या आदेशात काय म्हटले आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून सर्व प्रकारच्या जड-अवजड, मालवाहतूक करणा-या वाहनांना वाशी टोलनाका, अटलसेतू आणि एेरोली मार्गे मुंबईत प्रवेश कऱण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई शहराचे सर्व मार्गावरून मार्गस्थ होण्यास प्रवेश करण्यास आणि वाहने उभी करण्यास पुर्णता बंदी राहणार आहे.

जेएनपीए ते गव्हाण फाटा कंटेनर वाहतूक कोंडी

जेएनपीए बंदरातून जाणारे हजारो कंटेनर वाहने अडकून पडली आहेत. जेएनपीए बंदर ते करळ उड्डाणपूल, द्रोणागिरी औद्योगिक परिसर धुतुम,चिर्ले ते गव्हाण फाटा असा तब्बल दहा किलोमीटर लांबीच्या कंटेनर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत उरण वरून जाणारी अनेक प्रवासी वाहनेही अडकली होती. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचाही खोळंबा झाला होता. ही कोंडी दूर करण्यासाठी उरणच्या वाहतूक विभागाकडून प्रयत्न सुरू होते. पनवेल, नवी मुंबई आणि पुण्याच्या दिशेने जाणारी कंटेनर वाहनांच्या तीन तीन रांगा लागल्या होत्या. यातील एक रांग सुरू करण्यात उरणच्या वाहतूक पोलिसांनी यश आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात या मार्गावरील कंटेनर वाहतूक सुरू झाली असल्याची माहिती उरणच्या वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी दिली आहे.
Comments
Add Comment

Nashik : नाशिक-नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरण कामाची पाहणी, गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

Nashik : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या (Simhastha Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर नाशिक–नांदुरी रस्त्याच्या (Nashik-Nanduri road) सुरू असलेल्या

Monsoon Health Tips : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? ‘हे’ सोपे उपाय करा; आरोग्य राहील एकदम फिट!

मुंबई : पावसाळा सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होतं, पण त्याचबरोबर सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार, त्वचेचे संसर्ग

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,