Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या'चं दणक्यात कमबॅक! टीझर आला समोर; सगळे दिसले मात्र ते तिघे गायब?

‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठीच्या विनोदी कार्यक्रमाविषयी एक मोठी माहिती समोर आली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा होता. या कार्यक्रमातील सगळी पात्र, त्यातले विनोद प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे या कलाकारांनी या कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवलं. मात्र तब्बल १० वर्षं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केल्यानंतर, गेल्या वर्षी काही कारणांमुळे हा कार्यक्रम बंद करण्यात आला होता. कमी टीआरपीमुळे या कार्यक्रमाने सगळ्यांचा निरोप घेतलेला. 'चला हवा येऊ द्या' चा नवीन सीझन कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर ती प्रतीक्षा संपली आहे. हा लोकप्रिय शो पुन्हा एकदा नव्या रंगात आणि ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर करत ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वाची अधिकृत घोषणा केली आहे.


हा कार्यक्रम ऑगस्ट २०१४ पासून मार्च २०२४ पर्यंत सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिला. दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पुढे नेण्यात आला होता. त्यांच्यासोबत भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, विनीत भोंडे, कुशल बद्रिके, तुषार देवल, अंकुर वाढवे आणि इतर अनेक कलाकारांनी आपल्या अफलातून अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलं.





'चला हवा येऊ द्या' दिसणार नव्या ढंगात


आता 'चला हवा येऊ द्या'चे केवळ नवीन पर्व येणार आहे असे नाही, तर हा कार्यक्रम वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार. वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोनुसार या शोसाठी विनोदवीरांची ऑडिशन होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील कलाकारांना या मंचावर कला सादर करण्याची संधी मिळेल.महाराष्ट्रभरातील नवोदित हास्यकलाकारांना या मंचावर येण्याची एक सुवर्णसंधी मिळणार आहे.



११३७ एपिसोडस... ९ सीझन... १० वर्ष!


कार्यक्रमाच्या नव्या प्रोमोमध्ये अशी घोषणा करण्यात आली की, '१०वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक वादळ आलं होतं... ११३७ एपिसोडस... ९ सीझन... १० वर्ष! फक्त त्याचीच हवा होती. आता तेच वादळ पुन्हा येणार, कॉमेडीची सुपारी अख्ख्या महाराष्ट्राला देणार! कॉमेडीचा डॉन कोण आता ऑडिशन होणार'. झी मराठीवर लवकरच हा कार्यक्रम सुरू होणार आहे, पण अद्याप ऑडिशन कधी कोणार किंवा कार्यक्रम कधीपासून सुरू होणार याविषयी तपशील समोर आलेला नाही.



हुकमी एक्के गायब


हा प्रोमो पाहून एक गोष्ट नक्कीचं लक्षात येते, ती म्हणजे या प्रोमोमध्ये काही जुन्या आणि लोकप्रिय कलाकारांची अनुपस्थिती आहे. यामध्ये कार्यक्रमाचे काही हुकमी एक्के गायब आहेत आणि काही नवीन कलाकारांची एन्ट्री झाल्याचे दिसते आहे. या नव्या प्रोमोमध्ये श्रेया, भाऊ, कुशल, भारत या कलाकारांची झलक दिसली. याशिवाय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेही या प्रोमोमध्ये आहे, मात्र १० वर्ष या कार्यक्रमाची धुरा एकहाती सांभाळणारा डॉ. निलेश साबळे दिसला नाही, शिवाय विनोदवीर सागर कारंडेही यामध्ये नाही. इतरही काही कलाकार आहेत ज्यांनी हा कार्यक्रम गाजवला होता, पण त्यांची झलक यामध्ये दिसली नाही. आता केवळ या प्रोमोमधून ते गायब आहेत की कार्यक्रमातही ते झळकणार नाहीत, हे शो सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होईल. एकंदरीतच, ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे आणि पुन्हा एकदा हास्याचा बहर अनुभवण्यासाठी प्रेक्षक सज्ज झाले आहेत.

Comments
Add Comment

हाय-प्रोफाइल लग्नातही करण जोहर जेवत नाही; कारण ऐकून बसाल थक्क

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते करण जोहर आपल्या चित्रपटांसोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही

दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; गायिका उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कार मुंबई: हिंदीमधील अजरामर

‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानीचे एस.एस. राजामौलींने केले कौतुक

आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे,

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत