म्हाळुंगी नदीवरील पूल जनतेच्या सेवेसाठी खुला

नागरिकांची गैरसोय दूर


संगमनेर : शहरातील अत्यंत महत्त्वाचा असणारा स्वामी समर्थ नगर ते संतोषी माता मंदिर दरम्यानचा म्हाळुंगी नदीवरील पूल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जनतेसाठी खुला करण्यात आला आ.अमोल खताळ यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले.


शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.चार वर्षांपूर्वी हा पूल कोसळला होता यामुळे विद्यार्थी व नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.या पुलाचे काम करावे यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. यानंतर या पुलाच्या कामास सुरुवात झाली होती.या पुलाचे काल लोकार्पण करण्यात आले.यावेळी बोलताना अमोल खताळ म्हणाले की, पूर्वी या पुलाचे बांधकाम स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधीतून झाले होते.काही वर्षांपूर्वी एका ठेकेदाराच्या हल गर्जीपणामुळे हा पूल कोसळला होता. त्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन महसूल मंत्री आणि विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला. यामुळे दोन वर्षांपूर्वी, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी,या पुलाच्या नव्या कामास मंजुरी मिळाली होती. विशेष म्हणजे, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच या नव्या पुलाचे लोकार्पणही झाले, हा एक सकारात्मक योगायोग ठरला असल्याचे आ.खताळ यांनी सांगितले.या सोहळ्याला सौ.नीलम खताळ ,नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, महायुतीचे ज्ञानेश्वर कर्पे शिरीष मुळे,अविनाश थोरात,कैलास लोणारी,कैलास वाकचौरे रामभाऊ राहणे संदीप देशमुख सागर भोईर अल्पना तांबे उषा कपिले कांचन ढोरे कावेरी नवले दिपाली वाव्हळ रेखा गलांडे पुनम अनाप दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी लखन घोरपडे सौरभ देशमुख शौकत जहागीरदार कैलास कासार संपत गलांडे राहुल भोईर शशांक नामन सुशील शेवाळे मुजफ्फर जहागीरदार सुयोग गुंजाळ तुषार ठाकूर या पुलाचे बांधकाम करणारे ठेकेदार राऊत मामा अजित गुंजाळ गौतम शाह शैलेश मंडलिक जमशेद मिर्झा यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते साईनगर घोडेकर मळा पंपिंग स्टेशन परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद