शेतीला आता AI ची जोड! आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना मिळणार दुप्पट मानधन; मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय

  126

राज्यात AI शेतीधोरणास मंजुरी


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज १० महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यातील सर्वात क्रांतिकारी निर्णय म्हणजे “महा-ॲग्री-एआय धोरण २०२५–२०२९” ला मिळालेली मान्यता.


यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कृषि क्षेत्रात परिवर्तन घडविता येणार आहे. या धोरणामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान, ड्रोन, संगणकीय दृष्टिक्षमता, रोबोटिक्स आणि डेटा विश्लेषण यांचा वापर करून राज्यातील कृषी क्षेत्रात मोठं तांत्रिक परिवर्तन घडवता येणार आहे.


यामुळे महा-डिबीटी, महावेद, ॲग्रीस्टॅक, डिजिटल शेतीशाळा, ॲगमार्कनेट, क्रॉपसॅप यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प आणखी सक्षम होतील.



आणीबाणीतील लढवय्यांना सन्मान – मानधन दुप्पट


१९७५ च्या आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेले नागरिक आजही लोकशाहीचे खरे रक्षक मानले जातात. अशा लोकांच्या मानधनात आता दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेऊन सरकारने त्यांचा सन्मान केला आहे.



धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पुढील टप्प्याला वेग


देशातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीपैकी असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला नवसंजीवनी देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णयही याच बैठकीत घेण्यात आले.



परदेशात स्थायिक भारतीयांच्या मुलांसाठी शिक्षण निर्णय


अनिवासी भारतीय (NRI) नागरिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी नव्या धोरणात्मक सवलती आणि योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे त्यांना राज्यातील शैक्षणिक संधी अधिक उपलब्ध होतील.



राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील १० मोठे निर्णय


• ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास नाशिक जिल्ह्यातील मौजे जांबुटके येथील २९ हेक्टर ५२ आर जमीन. आदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन, रोजगार निर्मिती व आर्थिक विकासास चालना मिळणार. (महसूल विभाग)


• एमएमआरडीए आणि मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटर लि. यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत. सार्वजनिक, खासगी भागिदारीतून हा राज्यातील पहिलाचा मोठा प्रकल्प. ग्रोथ सेंटरमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षित होणार. (महसूल विभाग)


• मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी आवश्यक मौजे पहाडी गोरेगाव येथील जमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ. विद्यापीठाला स्व-मालकीची इमारत मिळणार. हजारो विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार. (महसूल विभाग)


• धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी (SPV) आणि अन्य यंत्रणा दरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ. लोकहितार्थ मोठा प्रकल्प असल्याने, पुनवर्सन व पुनर्विकास योजनेला गती लाभणार. योजनेची अंमलबजावणी सुलभ रीतीने होणार. (महसूल विभाग)


• केंद्र सरकारच्या WINDS (Weather Information Network Data System) प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची (AWS- Automatic Weather Station) उभारणी करण्यात येणार. यासाठी महावेध प्रकल्पास मुदतवाढ देण्याचा निर्णय. राज्यातील सर्व गावांमध्ये हवामान विषयक अचूक माहिती मिळावी यासाठीचा प्रकल्प. शेतकऱ्यांना हवामानाधारित कृषि विषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी महत्वाचा प्रकल्प. (कृषि विभाग)


• महाराष्ट्र कृषि- कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९ मंजूर. कृषि क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडविता येणार. कृत्रिम बुद्धीमत्ता, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता, रोबोटिक्स, पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत, राज्यातील ॲग्रीस्टॅक, महा-ॲग्रीस्टेक, महावेद, क्रॉपसॅप, ॲगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डिबीटी यांसारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार. (कृषि विभाग)


• मुंबई मेट्रो मार्ग-२अ, २ ब आणि ७ या मेट्रो प्रकल्पांकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कर्जास मुदतवाढ. (नगरविकास विभाग)


• विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आता "बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा" या तत्त्वावर हाती घेण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग).


• आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ. हयात जोडीदारालाही मानधन मिळणार. गौरव योजनेमध्ये सुधारणा. (सामान्य प्रशासन विभाग).


• अनिवासी भारतीयांच्या मुलांना, पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळणार. विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवासी भारतीयांच्या व्याख्येत बदल. प्रवेश व शुल्क यांचे विनियमन अधिनियम, २०१५ मध्ये सुधारणा. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

Comments
Add Comment

Jan Suraksha Bill: "देशविरोधी वृत्तीच्या नांग्या ठेचण्यासाठी आणलेल्या कायद्याला देशविघातक म्हणणार असाल तर दुर्दैव" दरेकरांनी विरोधकांना सुनावले

जनसुरक्षा विधेयकास विरोध करणाऱ्यांना आ. दरेकरांचे खडेबोल मुंबई: विरोधकांना डाव्या विचारसरणीचा अचानक पुळका

Jane Street: बाजाराला आणखी एक खळबळजनक पाचर ! जेन स्ट्रीट प्रकरण आणखी गुंतवणूकदारांचे नुकसान करणार? काय आहे नवी घडामोड जाणून घ्या

प्रतिनिधी: बाजारातील गुंतवणूकदार पुन्हा एकदा दबावाखाली येऊ शकतो. जेन स्ट्रीट प्रकरणानंतर संपूर्ण बाजार ढवळून

पुण्याच्या गुडलक कॅफेत 'बन मस्का'मध्ये आढळले काचेचे तुकडे

पुणे: पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील (FC Road) गुड लक कॅफे एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आला आहे. आकाश जलगी

शनिशिंगणापूर मंदिर भ्रष्टाचार प्रकरणी मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर: गुन्हे दाखल करण्याचे आदेश!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात शनिशिंगणापूर मंदिराचा भ्रष्टाचार वाचला मुंबई: महाराष्ट्राचे

विधानभवनात पडळकर-खोतांनी फाडला बनावट दुधाचा बुरखा! नाव न घेता साधला जयंत पाटलांवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दूध भेसळीचा मुद्दा तापला आहे! भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती

Jan Surksha Bill : कोणाचाही आंदोलनाचा अधिकार काढलेला नाही… जनसुरक्षा विधेयकाबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुंबई : जनसुरक्षा विधेयक हे विधासभेमध्ये काल मंजूर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत