पर्यटकांना खुणावतेयं मुळा नदीपात्र ! निसर्गाची अद्भुत किमया

राहुरी: तालुक्यातील पश्चिमेकडील भागातून वाहात असलेल्या मुळा नदीपात्रालगत असलेल्या डोंगर- टेकड्या,विपुल वृक्षाराजी नि त्यातून वेडीवाकडी खळाळणारी मुळामाई, नदीपात्रातील खडकातून कधी वाहणारी तर कधी लुप्त होणारे मुळा नदीचे पात्र पर्यटकांना निश्चितच भुरळ घालून जात असल्याचे विहंगम दृश्य सध्या मुळा नदीपात्रालगत फेरफटका मारताना दृष्टीस पडते आहे.



हरिश्चंद्रगडावरून उगम पावणारी मुळा नदी मुळातच निसर्गाच्या भरभरून दिलेल्या औदार्याचे समृद्ध प्रतीक म्हणाव लागेल.पावसाळ्याच्या पावसात खळाळून वाहणाऱ्या मुळामाईच सौंदर्य अगदी डोळ्यांचे पारणे फेडेल्यासारखेच म्हणता येईल. मुळा नदी ही संगमनेर व पारनेर तालुक्याच्या सरहदादीवरून वाहात पुढे राहुरी तालुक्यात वाहात गेलेली आहे.या नदीपात्रालगत असलेली अमाप वृक्षराजी,डोंगर,टेकड्यांचा खच त्यावरून घरंगळत येणारे पावसाचे पाणी मुळा नदीच्या सौंदर्यात भर घालणारे आहेच.त्यात नदीच्या खडकातच निसर्गाचा अद्भुत आविष्कार पहावयास मिळत आहे.


संगमनेर व पारनेर तालुक्याला जोडणाऱ्या मांडवे बुद्रुक येथील मुळा नदी पात्रात निसर्गनिर्मित रांजणखळगे तयार झाले आहेत.डोळ्यांचे पारणे फेडणारे हे दृश्य पाहून मानवी मनाचा शीणभाग हलका होईल तरीही मन भरणार नाही असचं या अविष्कार वर्णन करता येईल. इतके रांजणखळगे येथे निर्माण झाले आहेत.वेगवेगळ्या आकारांचे,उंचीचे,खोलीचे,कमी जास्त जोडीचे, एकमेकांत मिसळलेले हे रांजणखळगे जणूकाही भूतलावरचं अनोखं शिल्पसमूहच.म्हणतात ना,पृथ्वीतलावर सर्वात श्रेष्ठ शिल्पकार कोण असेल तर तो आहे निसर्ग.कारण या निसर्गाने आपल्या भोवताली इतक्या सुंदर कलाकृती निर्माण केल्या आहेत की,पाहणाऱ्याचे डोळेच दीपून जावेत.निसर्गाकडून तयार झालेल्या साऱ्याच कलाकृती या अवाढव्य आणि डोळे विस्फारणाऱ्या आहेत.मानवी मनाच्या शक्यतेच्या पलीकडच्या या कलाकृती निसर्गाने कशा तयार केलेल्या असतील याचे कोडे प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाही.एखाद्या मानवी शिल्पकाराकडे जसे छन्नी,हातोडा इत्यादी आयुधाद्वारे शिल्प तयार होत जाते मात्र निसर्गाकडे अशी कोणतीही आयुध नसताना अशी अप्रतिम कलाकृती निर्माण करण्याचे सामर्थ्य असते यावर विश्वास बसणे कठीण होवून जाते. निसर्गनिर्मित पाणी,हवा,अग्नी अशा वैशिष्ट्यपूर्ण आयुधांनी निर्माण झालेल्या या आगळ्यावेगळ्या व साऱ्या विश्वाला हेवा वाटावा अशा कलाकृतीतून रांजणखळगे मुळा नदी पात्रात निर्माण झाले आहेत.नदीतून वाहून आलेले दगड हे या बेसॉल्ट खडकांच्या छोट्या भेगांत अडकले जातात. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने हे दगड याच भेगांत जोराने फिरून गोलाकार खड्ड्यांमध्ये त्याचे रूपांतर होत असते.या प्रक्रियेला काही वर्षांचा कालावधी लागतो.त्यानंतर या छोट्या भेगा रांजणासारख्या खड्ड्यांचेच रूप धारण करत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.असेच निसर्ग निर्मित रांजणखळगे आज मुळा नदी पात्रात खळाळणाऱ्या नदीपात्रात सध्या पहावयास मिळत आहे.

Comments
Add Comment

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

ड्रायव्हिंग करताना मोबाईल-हेडफोन वापरल्यास नोकरी जाणार!

पीएमपीएमएल चालकांसाठी  महत्त्वाची बातमी पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) अलीकडेच झालेल्या

Pune News : धक्कादायक! पुण्यात विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा छळ, ढोल-ताशा पथकातील सदस्यांवर गुन्हा दाखल

पुणे : पुण्यात तब्बल ३३ तास अखंड सुरू राहिलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून

उकळत्या पाण्याने केला घात, PSI परीक्षेत राज्यातील मुलींमधून पहिल्या आलेल्या अश्विनी केदारींचा मृत्यू

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून मुलींमधून २०२३

नियमित रेशन न घेणारे ठरणार अपात्र

३४ हजार ७१४ लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद अलिबाग (प्रतिनिधी) : रेशनवरील धान्याची उचल वेळोवेळी न करणाऱ्यांचा

नागपुरात जड वाहनांना लाल सिग्नल : या वेळेत प्रवेश बंद !

नागपूर : नागपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि नागरिकांच्या त्रासाचा विचार करून वाहतूक