मुंबईतील वॉटर मेट्रोच्या काम लवकरात लवकर सुरू करावे : ना. नितेश राणे

वॉटर मेट्रोचा विकास आराखडा तीन महिन्याच्या आत सादर करण्याच्याही दिल्या सूचना


मुंबई : मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने वॉटर मेट्रो प्रकल्प महत्वाचा असून या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, तसेच वॉटर मेट्रोचा विकास आराखडा तीन महिन्याच्या आत सादर करावा अशा सूचना मत्स व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.



मुंबईमध्ये वॉटर मेट्रो सुरू करण्यासाठी पहाणी करण्याचे काम कोची मेट्रो रेल लि. कंपनीस देण्यात आले होते. त्यांच्या अहवालाचे आज मंत्रालयात मंत्री राणे यांच्या दालनात सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांच्यासह कोची मेट्रो रेल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. वॉटर मेट्रोच्या कामासाठी मंत्री राणे यांनी विविध स्तरावर प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन आता लवकरच वॉटर मेट्रो मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.


मुंबईमध्ये जल वाहतूकीसाठी मोठ्या संधी असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, विशेषतः बांद्रा, वरळी, वर्सोवा, दक्षीण मुंबई आणि नवी मुंबईमध्ये जल वाहतूकीच्या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. वॉटर मेट्रोचे मार्ग निवडताना या संधींचा पूर्ण विचार करावा. जास्तीत जास्त प्रवासी असणारा आणि जास्तीत जास्त फायद्याच्या मार्गांची निवड करण्यात यावी. वॉटर मेट्रोच्या तिकीटांचे दर ठरवताना ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतील असे पहावे. उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईमध्ये आणि नवी मुंबईतून दक्षिण मुंबईमध्ये येण्यासाठी वॉटर मेट्रो हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन विकास आराखडा तयार करावा. तसेच जेटी आणि मेट्रो टर्मिनलचा मेट्रोच्या धर्तीवर विकास करण्यात यावा. तसेच त्यांना वाहतूकीच्या इतर मार्गांनी जोडण्याची कार्यवाही करावी अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या.


मुंबई वॉटर मेट्रोसाठी एकूण २९ टर्मिनल उभारण्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. तसेच १० मार्गांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये वाढ करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. तसेच जेटी टर्मिनलवर प्रवाशांसाठी सुविधा उभारणे, बोट खरेदी, इतर सुविधा यांचा अंतर्भाव या प्रकल्पामध्ये असणार आहे. यासाठी एकूण अडीच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. वॉटर मेट्रोमुळे मुंबईतील प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Tourism : मुंबईत आणखी पर्यस्थळे स्थळे विकसित करण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी व्यक्त केला विश्वास मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत पर्यटनाची मोठी क्षमता,

Annabhau Sathe : अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचे हे नाट्यगृह म्हणजे समाजाप्रती असलेली समर्पणाची कृती

महापालिकेच्या वतीने भायखळ्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले गौरवोद्गार मुंबई (विशेष

BMC : महापालिका शालेय इमारतींची सुरक्षा आणि स्वच्छतेच्या कंत्राट कामांना मुदतवाढीचा शाप

जुन्या कंपन्यांवर प्रशासनाची मेहेरनजर.. कंत्राट संपून वर्ष उलटले तरीही नवीन नाही टेंडरचा नाही पत्ता मुंबई

नद्यांमधील गाळातून निघणारी वाळू आणि माती मोफत वाटणार

महसूल विभागाची नवी मार्गदर्शक नियमावली; शेतकऱ्यांना माती, तर घरकूल लाभार्थ्यांना मिळणार ५ ब्रासपर्यंत मोफत

ZP Elections : राज्यातील रखडलेल्या 'झेडपी' आणि पंचायत समिती निवडणुका डिसेंबरमध्ये?

- राज्य सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र; ५० टक्के आरक्षणाची मर्यादा पाळून निवडणुका घेण्याची

Mantralaya Canteen : मंत्रालयातील कँटीनच्या फ्रीजपेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ!

- उच्च न्यायालयाने 'एफडीए'ला सुनावले; सरकारी उपहारगृहे आणि खासगी आस्थापनांना वेगळा न्याय लावू नका मुंबई :