अमली पदार्थ विरोधात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पालघर : अमली पदार्थ विरोधात पालघर पोलिसांनी सुरू केलेल्या कठोर मोहिमेअंतर्गत विक्रमगड येथे मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा पालघर व विक्रमगड पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे ७ लाख ५ हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १३ जून रोजी सायंकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.


पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रमगड-जव्हार रोडवरील यशवंतनगर गावाजवळ सापळा रचला होता. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.


या दरम्यान, जव्हार बाजूकडून आलेली वेरणा कार थांबवून तपासणी केली असता, तिच्या डिक्कीत १०.२५८ किलो वजनाचा गांजा आढळून आला, ज्याची किंमत सुमारे २ लाख ५ हजार १६० रुपये इतकी आहे. याशिवाय, वापरलेली वेरणा कार सुमारे ५ लाख रुपये किमतीची असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ७ लाख ५ हजार १६० रुपये इतकी झाली आहे. या कारवाईत सतिश लक्ष्मण वाघ आणि सागर सोमनाथ बलसाने या दोघांना अटक करण्यात आली असून, ते दोघेही नाशिक येथील कुंभारवाडा भागातील रहिवासी आहेत.


पोलिसांनी त्यांच्यावर एन.डी.पी. एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, विक्रमगड पोलीस ठाण्यात प्रमाणे कारवाई नोंदवण्यात आली आहे. आरोपींना प्रथमवर्ग न्यायालय, जव्हार यांनी १७ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात सहा.पो.नि. रवींद्र पारखे, पो.उ.नि. रवींद्र वानखेडे, गोरखनाथ राठोड, भगवान पाटील तसेच पो.ह.वा. दिलीप जनाठे, संतोष निकोळे, संजय धांगडा, उत्तम बिरारी, शिवाजी भोईर यांच्यासह पो.अ.मं. प्रशांत निकम, विशाल कडव, संदीप कुवरा, भालचंद्र भोये, सुशिल बांगर हे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील