मुख्यमंत्री दौऱ्यासाठी काही ठिकाणच्या वाहतूक मार्गात बदल

पालघर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कौशल्य विकास उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आदी मान्यवर सोमवारी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या अनुषंगाने मुंबई गुजरात मार्गावर काही ठिकाणच्या वाहतूक मार्गात सकाळी ८ ते रात्री ८ वेळेत बदल करण्यात आले आहेत.


पालघर तालुक्यातील दुर्वेस येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम आयोजित आहे. त्याचप्रमाणे कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाच्या वतीने मनोर मैदान या ठिकाणी सामंजस्य करार कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अप्पर जिल्हा दंडाधिकारी सुभाष भागडे यांनी वाहतूक मार्गात बदल करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. हातनदी नाका ते नांदगाव फाटा यादरम्यान सर्व प्रकारची वाहतूक सोमवारी बंद ठेवण्यात आली आहे. तर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत मस्तान नाका ते मनोर मार्गे पालघर शहराकडे येणाऱ्या व पालघर शहराकडून मनोर मार्गे मस्तान नाकाकडे जाणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.


मनोर मुंबई गुजरात बाजूकडून पालघर बाजूकडे जाण्यासाठी चिल्हार फाटा बोईसर मार्गे पालघर व वरई फाटा -पारगाव- तांदुळवाडी - चहाडे नाका मार्गे पालघर अशाप्रकारे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पालघरकडून मुंबईकडे जाण्यासाठी चार रस्ता ते चहाडे नाका-तांदूळवाडी-पारगाव वरई फाटा हायवे अशाप्रकारे आणि गुजरातकडे जाण्यासाठी पालघर चार रस्ता ते बोईसर चिल्हार फाटा हायवे मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे.


दरम्यान अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी सदर आदेश लागू राहणार नाही असे प्रशासनाच्या वतीने वाहतूक मार्गात बदल करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले असुन माहिती देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व

वसईत आयकर विभागाच्या धाडी, हॉटेल व्यवसायिकाच्या मालमत्तेची छाननी

वसई : राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान सुरू असताना वसईत आयकर विभागाने एका हॉटेल व्यावसायिकाच्या

डहाणू नगर परिषद निवडणुकीत थेट लढत!

पालघर, वाडा, जव्हारमध्ये तिरंगी लढत पालघर : नगर परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक

वाडा नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत

कुडूस  : वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात असून वाडा नगरपंचायत निवडणुकीत खरी लढत ही

वसई-विरारमध्ये ५२ हजार दुबार मतदार

मतदारांकडून लिहून घेणार हमीपत्र विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

चार नगर परिषद निवडणुकीसाठी १२५ मतदान केंद्र ; प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

पालघर : पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार, या नगर परिषद आणि वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज