बोरिवली ते ठाणे भुयारी रस्ता प्रकल्प पुनर्वसनाला गती

एमएमआरडीएकडून तीन पर्यायांची घोषणा


मुंबई :मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) ठाणे (टिकुजिनीवाडी) ते मागाठाणे-बोरिवली दरम्यान प्रस्तावित दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्पाची कामे प्रगतिपथावर आहेत. या प्रकल्पासाठी मागाठाणे परिसरातील रूपवते नगर, मिलिंद नगर, फरलेवाडी, एस.आर.ए.प्रकल्पातील तसेच रस्त्यालगतच्या फूटपाथवरील अंदाजे ५७२ झोपड्या बाधित होत आहेत.


प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रकल्पग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यासाठी एमएमआरडीएने तीन पर्यायांची रूपरेषा जाहीर केली असून, बाधित नागरिकांनी या पर्यायांपैकी कोणता पर्याय स्वीकारायचा आहे हे लेखी स्वरूपात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे:


१. आर्थिक मोबदला: एमएमआरडीएच्या आर्थिक मोबदला धोरणानुसार प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या बाधित होणाऱ्या झोपड्यांचे क्षेत्रफळानुसार देय आर्थिक मोबदला स्वीकारता येईल.


२. स्थायी निवास: मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे बोरीवली इंटिग्रेटेड वसाहतीमधील सदनिका व मीरा-भाईंदर येथील रेंटल हाऊसिंग योजनेतील मे. गुजरात व सोनम इंटरप्राईजेस यांनी विकसित केलेल्या सदनिका प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार पुनर्वसनासाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात येतील.


३. एसआरए प्रकल्पामार्फत पुनर्वसन: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील मे.भारद्वाज विकसकामार्फत राबविण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार त्यांना समाविष्ट केले जाईल. विकासकामार्फत प्रकल्प बाधितांना त्याच ठिकाणी कायमस्वरूपी सदनिका देण्यात येणार असून तात्पुरत्या स्वरूपात त्यांना भाडे अथवा सदनिका उपलब्ध करून देण्यात येतील. एमएमआरडीएने सर्व प्रकल्पबाधित नागरिकांना सूचना केली आहे की त्यांनी वरील तीन पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून त्याबाबत लेखी अर्ज तात्काळ एमएमआरडीएकडे सादर करावेत.

Comments
Add Comment

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर

मालाडमधील फोर डायमेंशन इमारतीला आग

मुंबई: मालाड पश्चिम येथील माइंडस्पेसजवळ लिंक रोडवरील फोर डायमेंशन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी आग लागली. मुंबई

मुंबईच्या काळाचौकी परिसरात रक्तरंजित थरार!

प्रेमभंगातून तरुणाचा प्रेयसीवर जीवघेणा हल्ला, नंतर स्वतः केली आत्महत्या मुंबई : मुंबईतील काळाचौकी भागात एक खूप

हातपाय बांधले आणि चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारले

मुंबई : चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण मुंबईतील गोरेगावमध्ये काही प्रमाणात खरी ठरली. गोरेगावच्या तीन डोंगरी

मुंबईतील स्ट्रीट फर्निचरच्या कंत्राट कामांना बोनस, आणखी वाढवून दिली एवढ्या कोटींची रक्कम

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या प्रशासकांच्या काळात मंजूर झालेल्या वादग्रस्त स्ट्रीट फर्निचरची कामे