अभिनेत्री रवीना टंडनने शेअर केला एअर इंडिया विमानाच्या प्रवासाचा अनुभव

मुंबई : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडिया विमानाचा मोठा अपघात झाला.या घटनेनंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. एअर इंडियाच्या विमान अपघात घटनेनंतर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने विमानाने प्रवास केला आहे. यावेळी रवीना टंडन हिने अपघातानंतर एअर इंडिया विमानात काय परिस्थिती होती याचा अनुभव शेअर केला आहे.


अभिनेत्री रविना टंडन आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, "नवीन सुरुवात.. परिस्थिती विरोधात असताना पुन्हा उडण्याचं आणि मोठं व्हायचं... पुन्हा नवीन सुरुवात करायची. अधिक सक्षम होण्यासाठी नवीन संकल्प करायचे. वातावरण गंभीर होते आणि क्रू मेंबर्स दु:खाची लकेर असलेल्या हसऱ्या चेहऱ्याने स्वागत करत होते. शांत प्रवासी आणि क्रू यांच्यातील अव्यक्त शोकभावना. पण तरीही त्यांच्यातील आत्मविश्वासाने ते जोडले आहेत. ज्यांनी प्रियजन गमावलेले त्या सगळ्या कुटुंबीयांप्रती शोकभावना आहेत. ही जखम कधीच भरुन न निघणारी आहे. एअर इंडिया निर्भय(घाबरत नाही) आहे. त्यामुळे यातूनही आणखी खंबीरपणाने उभी राहील. जय हिंद".


दरम्यान, अहमदाबाद येथून उड्डाण घेताच १२ जून रोजी एअर इंडियाचे विमान मेडिकल हॉस्टेलवर कोसळलं. या अपघातात विमानातील एकूण २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. केवळ एक प्रवासी दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातातून बचावला आहे. तर हॉस्टेलमधील काही निवासी डॉक्टर आणि आसपासच्या परिसरातील काहींचा यात मृत्यू झाला आहे.

Comments
Add Comment

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि

६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली