जिल्ह्यात वाढला मतदारांचा टक्का

नालासोपाऱ्यात सर्वाधिक ४२ हजार मतदार


विरार : पालघर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांमध्ये मतदार संख्येच्या तुलनेत सर्वात मोठा असलेल्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीनंतर दररोज सरासरी २०० मतदारांची वाढ होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघात मे अखेरपर्यंत ४१ हजार ९९६ मतदारांची वाढ झाल्याने हा मतदारसंघ आता ६ लाख ५० हजार ४९५ मतदार संख्येचा झाला आहे.



मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी यापूर्वी दरवर्षी १ जानेवारी हा अहर्ता दिनांक गृहीत धरून वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक युवतींना मतदार यादी मध्ये नाव नोंदविता येत होते.आता मात्र ऑनलाइन पद्धतीने वर्षभरात सर्वच दिवसांमध्ये मतदार म्हणून मतदार यादी मध्ये नोंदणी केल्या जाऊ शकते . दरम्यान, पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी लोकसभा क्षेत्रात २२ लक्ष १९ हजार ३३ मतदारांची नोंद होती. मात्र निवडणुकीपूर्वीच्या अखेरच्या पंधरा दिवसात त्यामध्ये तब्बल ७७ हजार ३३ मतदारांची वाढ होऊन निवडणुकीसाठी पात्र मतदारांची संख्या २२ लक्ष ९२ हजार ६६ इतकी झाली होती. विधानसभा निवडणुकीनंतर आता नगरपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी मतदार वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत ,त्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात ९२ हजार मतदारांची वाढ झालेली आहे. त्यामुळे मे २०२५ अखेर पर्यंत जिल्ह्यातील मतदार संख्या २३ लक्ष ८३ हजार ८०८ इतकी झाली आहे. वाढ होत असलेल्या मतदारांमध्ये नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक पहिला आहे. त्यामुळे नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील मतदार संख्या आता ६ लाख ५० हजार ४९५ इतकी
झाली आहे . तर बोईसर विधानसभा ४ लाख ३४ हजार ९६९, वसई विधानसभा ३ लाख६२ हजार ४४२, विक्रमगड ३ लाख २२ हजार ८९७, डहाणू ३ लाख ८ हजार ८८१ आणि पालघर विधानसभा मतदारांची संख्या ३ लाख ४ हजार १२४ एवढी झाली आहे.


वाढता टक्का कोणाच्या पथ्यावर?
आगामी पालिका निवडणुकीच्या आनुषंगाने नालासोपारा मतदारसंघातील वाढलेला मतदारांचा टक्का काही प्रभागांमधील निकालासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये होणाऱ्या प्रमुख लढतीत वाढलेल्या मतदारांना महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे वाढलेले मतदान कुणासाठी फायद्याचे ठरेल हे जरी सध्याच कळणार नसले तरी, महापालिकेच्या निवडणुकीत हे मतदार प्रभागात बरीच उलथापालथ करू शकतात यात शंका नाही.



...असे वाढले मतदारसंघातील मतदार


विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम झाली. आणि त्या यादीनुसार मतदान घेण्यात आले. या निवडणुकीनंतर मे २०२५ पर्यंत सर्वाधिक नालासोपारा विधानसभा मतदारसंघात ४१ हजार ९९६ मतदारांची वाढ झाली आहे. बोईसर विधानसभा क्षेत्रात २३ हजार ६४० वसई मतदार क्षेत्रात ७ हजार ७९०, डहाणू विधानसभा क्षेत्रात ७ हजार ६४२, पालघर विधानसभा क्षेत्रात ५ हजार ५४५ तर विक्रमगड विधानसभा क्षेत्रात ५ हजार १५६ मतदार वाढले आहेत.

Comments
Add Comment

वसईत आयकर विभागाच्या धाडी, हॉटेल व्यवसायिकाच्या मालमत्तेची छाननी

वसई : राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान सुरू असताना वसईत आयकर विभागाने एका हॉटेल व्यावसायिकाच्या

डहाणू नगर परिषद निवडणुकीत थेट लढत!

पालघर, वाडा, जव्हारमध्ये तिरंगी लढत पालघर : नगर परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक

वाडा नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत

कुडूस  : वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात असून वाडा नगरपंचायत निवडणुकीत खरी लढत ही

वसई-विरारमध्ये ५२ हजार दुबार मतदार

मतदारांकडून लिहून घेणार हमीपत्र विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

चार नगर परिषद निवडणुकीसाठी १२५ मतदान केंद्र ; प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

पालघर : पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार, या नगर परिषद आणि वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

विरारमध्ये ११ वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू; पालिकेच्या गार्डनमध्ये दुर्घटना

विरार : विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या गार्डनमधील तलावात खेळता खेळता पाय घसरल्याने ११