भारत २०२९ पर्यंत महासत्तेच्या पहिल्या दोन क्रमांकावर

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा विश्वास


कणकवली : २०१४ मध्ये नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर देशाची सर्वांगीण प्रगती सुरू झाली. आर्थिक नियोजन आणि दूरदृष्टी ठेवून प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत पुढे घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देश सर्वांगीणदृष्ट्या सक्षम बनविला. गेल्या अकरा वर्षांत जगात भारताची प्रतिमा उजळून निघाली. देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला. आज जपान सारख्या देशाला मागे टाकून आपण आर्थिकदृष्ट्या पुढे गेलो आहोत. २०१९ पर्यंत आपला भारत देश जगातील महासत्तेच्या पहिला दोन क्रमांकावर पोहोचणारा देश असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्ता होईल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. तर ‘ऑपरेशन सिंदुर’च्या माध्यमातून मोदी सरकारने करारा जबाब देत नव्या भारताची ओळख जगाला करून दिली असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.



भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला अकरा वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने विकसित भारताचा अमृत काल, सेवा सुशासन आणि गरीब कल्याण हे मोदी सरकारची अकरा वर्षे विकासाची ध्येय दृष्टी गाठणारी होती याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, संयोजक मनोज रावराणे, सहसंयोजक लखमराजे भोसले, डॉ. मिलिंद कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.


मंत्र नितेश राणे म्हणाले, विकसित भारत, आत्मनिर्भर भारत आणि संकल्प सिद्धीस नेणारा भारत म्हणून हा पंतप्रधान मोदी यांचा अकरा वर्षाचा कालखंड ओळखला जाणार आहे. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचारांमध्ये गुरफटलेला भारत दिसत होता. जगात भारताच्या पंतप्रधानाची पत हरवली गेली होती. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जग पातळीवर जो देशाला मान सन्मान मिळत आहे यातून आपल्या कारकीर्दीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची पोच पावती मिळते.
‘ना खाऊंगा ना खाणे दुंगा’ या भूमिकेमुळे २०१४ पासून ते आतापर्यंत भारत आज अकरा वर्षांत भ्रष्टाचार मुक्त झाला. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारत देश खंबीर असल्याची पावती देणारे ऑपरेशन होते. देशातील नक्षल चळवळ संपुष्टात आणले आहे. मोदीच्या संकल्पना आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रयत्नातून नक्षल मुक्त भारत केला आहे. ३७० कायदा हटविला,राममंदिर उभे केले. भारत देश रोजगार देणारा देश बनला, असे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Taj Hotel In Kokan : कोकणात 'ताज'चं आगमन! सिंधुदुर्गातील पहिल्या पंचतारांकित हॉटेलचा मार्ग मोकळा

ताज ग्रुपच्या आलिशान प्रकल्पाला 'ग्रीन सिग्नल' सिंधुदुर्ग : निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आता

जिल्ह्यात ३१ ठिकाणी ‘५ जी’ मोबाईल टॉवर

कणकवली : भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ ठिकाणी ५ जी मोबाईल टॉवर

मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण नगरपरिषद तर कणकवली नगर पंचायतीसाठी निवडणूक

Nitesh Rane : "महापालिकांवर आता फक्त भगवाच फडकणार"! मंत्री नितेश राणेंना विजयाचा विश्वास

सगळीकडे भगवाधारी महापौर दिसणार : मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : निवडणुकीच्या निकालांनंतर राजकीय वातावरण तापले

घोणसरी येथे मादी बिबट्याला पकडून सोडले अधिवासात

कणकवली : कणकवली तालुक्यातील घोणसरी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सती मंदिर येथे बिबट असल्याचे नागरिकांनी कळवले.

कोकणासाठी सोनेरी दिवस; महाराष्ट्र सरकार उभारणार वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग

मंत्री नितेश राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण